माणसाचा माणसावर राहिला विश्वास नाही
अन् भरवशासारखा तर मित्र दुसरा खास नाही
मैफिलीला रंग चढतो गीत गाताना व्यथेचे
सूर सच्चा वेदनेचा पण सुखाचा श्वास नाही
शव मुलाचे पाहिल्यावर बोलली ती वीरमाता
पुत्र का पदरात माझ्या आणखी देण्यास नाही
धावतो आहे किती तो भौतिकाच्या आज पाठी
संपले आयुष्य सारे संपला हव्यास नाही
रक्त त्याचे सांडल्यावर देश बेड्यामुक्त झाला
त्या हुतात्म्याचा कुणाला माहिती इतिहास नाही
माधुरी डोंगळीकर
पुणे
मो. 99217 82867
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=