Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शहादा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा -मकरंद पाटील साहेब युवा मंचची मागणी

शहादा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा -मकरंद पाटील साहेब युवा मंचची मागणी 


शहादा,दि.31(प्रतिनिधी)
    यावर्षी अद्याप पुरेसा पाऊस झाला नसल्याने शहादा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा यासाठी प्रा. मकरंद पाटीलसाहेब युवा मंचच्या वतीने प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले.
    मंचच्या वतीने यावर्षीची दुष्काळी परिस्थिती पहाता प्रमुख मार्गदर्शक प्रा.मकरंद पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी शेतकरी बांधवांना अडचणीच्या प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.वाढदिवसाचे औचित्य साधून मंचच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दीपक गिरासेसाहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की,नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आमचा शहादा तालुका वसलेला आहे. तापी- गोमाईच्या पट्टयातील शहादा परिसराचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. या वर्षी जून महिन्यापासूनच परिसरात जेमतेम पाऊस झालेला आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी सरासरीपेक्षा निम्मेही पर्जन्यमान नसल्याने शेत- शिवारातील पिके करपू लागली आहेत. परिसरात ऊस, कापूस, पपई, केळी, मका, मूग, सोयाबीन आदि पिके घेतली जातात. मात्र पावसाअभावी येथील शेतकरी हवालदिल झालेले आहेत. शेतीसह जनावरांना चारा व पाणीही पुरेसे उपलब्ध होत नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी सद्यःस्थितीचा विचार करता शहादा तालुका दुष्काळी जाहीर करावा व शेतकरी बांधवांना मदतीचा हात द्यावा.निवेदन देतांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, मोतीलाल जैन,रूपेश जैन, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष विनोद जैन, माजी शिक्षण सभापती ज्ञानेश्वर चौधरी,प्रा.मकरंद पाटीलसाहेब युवा मंचचे रमाशंकर माळी,समीर जैन,ललीत छाजेड,किशन चौधरी,जयेश पाटील,सागर मराठे, कार्तिक नाईक,सागर पाटील, योगेश पाटील,शरद पाटील, अंकुर पाटील,दिलीपसिंग गिरासे, सुरेंद्र गिरासे,नरेश शिंदे, विलास पाटील, विशाल मोरे, श्रीकांत जाधव, गौरव पाटील, नितीन तिरमले, तुषार पाटील, प्रशांत पाटील,नजमोद्दीन खाटीक,भरत पाटील, घनश्याम मराठे, आनंद कोळी, अतुल सोनवणे आदी उपस्थित होते.