तळोदा दि ९(प्रतिनिधी) आदिवासी पारंपारिक वाद्यातून निघणाऱ्या सुरांवर तालबद्ध नृत्य, तूर आणि थाळीतून कानी पडणाऱ्या मधुर संगीताच्या तालावरील ठेका यासह व डिजेवर सुरू असलेले एकच चले आदिवासी चले या गीतांवर ठेका धरत सांस्कृतिक आणि आदिवासी कला आविष्कारांचे दर्शन आदिवासी तरुणांकडून घडविण्यात आले.
जय आदिवासी युवा संघटनेचे वतीने आयोजित जागतिक आदिवासी दिनाच्या मिरवणुकीत विविध संघटनेने सहभाग नोंदवला, सुरुवातीला आमदार राजेश पाडवी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यावर पुष्प अर्पण करून अभिवादन केले. सुरुवातीला मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध करत श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर जय आदिवासी युवा संघटनेच्या वतीने लावण्यात आलेले बिरसा मुंडा चौक फलकाचे अनावरण आमदार पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत मा.नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी नगरसेवक संजय माळी, जितेंद्र सुर्यवंशी, गौरव वाणी, हितेंद्र क्षत्रिय, योगेश चौधरी, योगेश मराठे, कैलास पाडवी, पंकज राणे, प्रकाश वळवी, जगदीश परदेशी, संदीप परदेशी, बब्बु माळी, दारासिंग वसावे, हेमलाल मगरे, गुड्डू वळवी, डॉ.महेंद्र चव्हाण, निलेश माळी, दगुलाल माळी, नारायण ठाकरे, कैलास चौधरी, योगेश चौधरी अरविंद पाडवी, नितीन पाडवी, राहुल पाडवी, रामानंद ठाकरे, गणेश राणे, देवेश मगरे, बबलू कोळी, अरविंद पाडवी, योगेश पाडवी, गोविंद पाडवी, नितीन पाडवी, विवेक पाडवी, बळीराम पाडवी, गोपी पावरा, पंकज पावरा,विनोद माळी, आदिजन उपस्थित होते.
बिरसा मुंडा चौक पासून मिरवणुकीला सुरुवात झाली. एकमेंकांच्या हातात हात गुंफलेले, आदिवासी गीतांवर तल्लीन झालेल्या आदिवासी तरुणांनी संस्कृतीचे सुरेख दर्शन घडविले. यावेळी मुख्य बाजारपेठ ‘जय आदिवासी”, बिरसा मुंडा की जय” अश्या घोषणांनी घुमून उठला होता. तरुण तरुणीचा विविध गट मिरवणुकीत टप्याटप्यावर तालबध्द आणि मनमोहक आदिवासी कला अविष्कारांचे सादरीकरण करीत असल्याने मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती... हातोडा रस्त्यावर सावता माळी चौक पावेतो ही मिरवणूक निघाली व विविध घोषणा बाजी करत या मिरवणुकीची सांगता झाली. या मिरवणुकीत विविध पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.. मिरवणुकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या अनुषंगाने पो.नी.राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्त ठेवण्यात आला...