नंदुरबार । दि. ९ । प्रतिनिधी
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज दि. ९ रोजी मणिपूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ व आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी समाजाच्या संविधानिक हक्कांसाठी जिल्ह्यात हजारोच्या संख्येने आदिवासी बांधवांनी जनआक्रोश मोर्चा काढला यांत मुस्लिम समाजाने पाठींबा देत सहभाग घेतला.
जिल्हाभरातुन आलेल्या सर्व प्रकारच्या नेतृत्वाने शहरातील महाराणा प्रताप चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरुन सदर आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मोर्चात सहभागी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन मणिपूरच्या घटनेचा निषेध केला.
मणिपुर राज्यातील आदिवासी स्त्रियांची नग्न धिंड काढण्यात आली. बलात्कार करुन त्यांची निघून हत्या करण्यात आली. त्यांना वाचवण्यास गेलेल्या भाऊ व वडीलांची देखील हत्या करण्यात आली. आदिवासी समाजाची हजारो घरे जाळली. १५० पेक्षा जास्त आदिवासीची हत्या करण्यात आली ५० ते ६० हजार लोकांना बेघर करण्यात आले.
मागील तीन महिन्यापासुन मनिपुरमधील ) आदिवासीवरील अन्याय व क्रूर अत्याचार रोखण्यास केंद्र व राज्य सरकार टाळाटाळ करीत आहेत. याशिवाय मध्यप्रदेश राज्यात आदिवासी व्यक्तींवर लघुशंका करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी वस्तीगृहातील अल्पवयीन मुलींना पर्यटकांचे मनोरंजन करण्यासाठी हॉटेल, रिसॉर्ट मध्ये नाचायला लावले. समान नागरीक कायदा आणून आदिवासींना संविधान सभेमध्ये दिलेले महामानव जयपालसिंह मुंडा यांनी ५ वी, ६ वी अनुसुची व पेसा कायद्या पासुन वंचित ठेवून आदिवासीचे अस्तित्वच नष्ट करीत आहेत म्हणुन या कायद्याला देखील समस्त आदिवासी समाजातर्फे तिव्र निषेध करण्यात आला. जन आक्रोश मोर्चा मध्ये सर्व आदिवासी बांधव पारंपारीक पेहराव
करुन काळे वस्त्र किंवा काळा रुमाल, काळी पट्टी बांधुन सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. तेथे मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.