🌹संसार मोठा सापळा 🌹
आलो कधी कोठून मी,कोठे मला पोचायचे
मार्गावरी अज्ञात या रात्रंदिवस चालायचे
सुखदुःख खोट्या कल्पना का जाचती माझ्या मना..
संसार मोठा सापळा ना त्यामधे गुंतायचे
का मृगजळामागे असे वेड्यापरी धावायचे
लाटांसवे झुंजून मी भवसागरी पोहायचे
जे भोग माझ्या प्राक्तनी असतील ते भोगायचे
माझे सगे अन सोयरे माझेच मी पोसायचे
माझेच सारे कां मला, सोडून येथे चालले
त्यांच्या विना मी एकटा, सारे कसे सोसायचे
सौ. अनघा पतके
खंडाळा जि. सातारा
मो. 9764860296
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=