• आजची गझल • (भाग ४३ )
खेड्यामधली मुलगी का भावत नाही
श्रीमंताची कन्या काही गावामध्ये राहत नाही
खेड्यामधली मुलगी का मग लेकालाही भावत नाही
श्रीमंतीच्या खाणीवरती मुलगी जेव्हा भाळुन गेली
नवऱ्याच्या पैशापेक्षा गुणदोषाला का पाहत नाही
कान्हाच्या सावळ बाधेवर वेडी झाली होती राधा
लग्नासाठी पोरी आता नवरा काळा निवडत नाही
वाटाघाटी करता करता देवांचेही झाले वाटे
मोठी जागा देव्हाऱ्याची उत्साहाची वाटत नाही
येतो करता श्रीमंतपणाचा ताठा मोठा केव्हाही
संकट समयी नुसता पैसा जगण्यासाठी चालत नाही
बसल्या जागी मारत असतो गप्पा मोठ्या व्यवसायाच्या
तरणाताठा असतांनाही पोटासाठी कमवत नाही
वैचारिक ते मंथन म्हणजे फांद्या बळकट झाडावरच्या
वाचन वर्धन संस्कृतीविन त्याही भक्कम वाढत नाही
सौ. प्रज्ञा कुलकर्णी (राज्ञी)
वसमत जि. हिंगोली
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=