Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विश्व आदिवासी गौरव दिवस व क्रांती दिवस माध्यमिक विद्यालय तुळजा येथे आदिवासी वीरांच्या वेशभूषेत साजरा

माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे विश्व आदिवासी गौरव दिवस व क्रांती दिवस मोठ्या  उत्साहात साजरा
       तळोदा दि ९ (प्रतिनिधी) माध्यमिक विद्यालयात तुळजा येथे विश्व आदिवासी गौरव दिवस व क्रांती दिवस मुख्याध्यापक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनाने तसेच आदिवासी एकता युवा मंच यांचा संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.           कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती मीराताई राहासे तर प्रमुख पाहुणे उपसरपंच संदीप खर्डे ,पोलीस पाटील रातीलाल डुमकुल, जि. प. सदस्या सूनिताताई पवार,तंटामुक्ती अध्यक्ष तेजाब महाराज ग्रामपंचात सदस्य लक्ष्मण पवार,विक्रमसिंह डूमकुल,वंदना खर्डे,निशा जांभोरे,जमुणाबाई तेली, असमा खर्डे,दिलीप पवार, कमलबाई जाधव माजी प.स. सदस्य सीताराम राहासे,सामजिक कार्यकर्ता सचिन राहासे तसेच आदिवासी एकता युवा मंचचे सर्व पदाधिकारी ,विद्यालयाचे शिक्षक दिलीप पाटील, अशोक महाले, राजेंद्र ढोढरे,विलास मगरे,तुकाराम भील, सुदाम जांभोरे, राहुल साळुंखे, पंकज खेडकर, महेंद्र कुवर, मोहन सिंग वळवी, सुबोध जावरे आदी या कार्यक्रमास उपस्थित होते. मान्यवरांनी प्रतिमा पूजन करून विद्यार्थ्यांच्या रॅलीस सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी आदिवासी पोशाख धारण करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन संपूर्ण गावात घडविले त्यात विद्यार्थ्यांनी पारंपारिक आदिवासी नृत्य सादर केले. त्यानंतर दुर्गा माता चौकात विद्यार्थ्यांना आपले मार्गदर्शन करताना सिताराम राहासे यांनी आदिवासी संस्कृती संदर्भात सखोल माहिती दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास मगरे यांनी केले तर आभार दिलीप पाटील यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.