मोलगी दि ९ (प्रतिनिधी)
अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम परिसर असलेल्या मोलगी गावातील मुळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सीता वसावे मॅडम व कार्यक्रमाच्या अध्यक्षा कनिया तडवी होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आदिवासी जननायक बिरसा मुंडा व आदिवासी कुलदैवत याहा मोगी मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. शिक्षिका मनीषा वसावे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सीता वसावे यांनी आदिवासी संस्कृती व रुढी परंपरेविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर रामसिंग वसावे यांनी विविध विषय हाती घेत मार्गदर्शन केले. कनिया तडवी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शाळेतील शिक्षिका लीला पाडवी यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी क्रांतिकारकांविषयी मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील विद्यार्थी श्रेयश पाडवी, सनिकेत अहिरे, अध्ययन वसावे, श्लोक चव्हाण, किंजल वळवी, प्रणीत वसावे, अश्रिता वळवी, कल्याणी राऊत, मनस्वी वळवी, तन्वी वळवी, विहान वसावे, प्राची तडवी, श्रद्धा वसावे, आरोही वसावे, अधिका वसावे, सत्यम वळवी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच लहान- लहान विद्यार्थ्यांनी विविध आदिवासी पोशाख परिधान करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली व वेगवेगळ्या संस्कृतिक गीतांचा आनंद घेतला. या कार्यक्रमास विक्रम वसावे, रामसिंग वसावे, हीराबाई वळवी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेचे प्रिंसिपल गोटूसिंग वळवी यांनी केले तर आभार ईश्वर वसावे यांनी मानले.