Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राणाप्रताप इंग्लिश स्कूल प्रतापपुर येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा


राणाप्रताप इंग्लिश स्कूल प्रतापपुर येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा

तळोदा दि..09(प्रतिनिधी) राणा प्रताप इंग्लिश स्कूल, प्रतापपुर ता.तळोदा. येथे नव ऑगस्ट क्रांती व जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी .मुख्याध्यापक. हेमलाल पुरुषोत्तम मगरे हे होते. प्रसंगी  आदिवासी शिक्षक बंधू - भगिनी तसेच विद्यार्थी यांच्या हस्ते  भारतमाता, आदिवासी समाजाचे कुलदैवत आदी शक्ती श्री.देवमोगरा माता, धरती आबा बिरसा मुंडा,विर खाज्या नाईक, क्रांतिकारक तंट्या भील,भीमा नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन तथा पुष्प अर्पण करून अभिवादन पर वंदन करण्यात आले. यावेळेस संस्थेचे सचिव तथा राणा प्रताप इंग्लिश स्कूल, प्रतापपूर (तालुका तळोदा) व महात्मा गांधी इंग्लिश स्कूल खापर, (तालुका अक्कलकुवा) या शाळांचे चेअरमन  प्रभाकरजी संभु चौधरी, उपाध्यक्ष.योगेश चौधरी, ज्येष्ठ संचालिका सौ.रत्नाताई प्रभाकर चौधरी,माजी उपनगराध्यक्षा सौ.भाग्यश्रीताई चौधरी यांनी पाठवलेल्या अभिवादन संदेशाचे वाचन करून ऑगस्ट क्रांतीतील थोर आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. प्रसंगी शाळेतील विद्यार्थीनी  कुमारी.हेमलता ठाकरे व हर्षदा पावरा हिने विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त प्रशंसनीय वक्तृत्व सादर केले. कुमार.अभिजित छोटू पावरा याने वीर धनुर्धर एकलव्य तर कुलदीप पावरा याने भगवान बिरसा मुंडा यांची वेशभूषा  साकारली. शिक्षक मनोगतात कौशलकुमार सवाई,.परबत जगन ठाकरे व श्रीमती. सहिदा इंद्रसिंग पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर.कौशलकुमार सवाई यांनी आदिवासी गीत सादर करून विद्यार्थ्यांची दाद मिळवली.अध्यक्षीय भाषणात  हेमलाल मगरे यांनी आदिवासी समाजातील क्रांतीकारकांनी तसेच समाज बांधवांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामामध्ये केलेल्या समर्पण,त्याग या विविध गोष्टींवर उजाळा टाकला. विशेष म्हणजे त्यांनी तळोदा तालुक्यातील रावलापाणी येथील ऐतिहासिक घटनेचा उल्लेख करून स्वातंत्र्य लढ्यातील तळोदा तालुक्याचे ही प्रबळ योगदान असल्याचा पुरावा आजही शाबूत असून इतिहासात त्याची नोंद आहे.महाराष्ट्र विधिमंडळ मुंबई येथे नुकत्याच सुरू असलेल्या अधीवेशनात रावळापाणी या ऐतिहासिक स्थळाला मूलभूत समस्या उपलब्ध होणार असून अभ्यास क्षेत्र म्हणून तेथील विकास कामासाठी लक्षवेधीत मार्ग  मोकळा झाला आहे. ते पुढे म्हणाले की, तळोदा तालुक्याने ही भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात आणि विशेष करून आदिवासी समाज,युवक अग्रस्थानी होता. म्हणून अभिवादन करणे तसेच त्यांचे कार्य हे समाजापुढे आणणे अनिवार्य आहे.आदिवासी क्रांतिकारकांनी इंग्रजांना जंगलावर कधीही साम्राज्य गाजू दिले नाही. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊन जगाने ही आदिवासी समाजाची दखल घेत विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा करण्याचे निश्चित केले. म्हणून आपण ९ ऑगस्ट हा दिवस अतिशय आनंदाने साजरा करत असतो,असे प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक  कौशल कुमार सवाई , सूत्रसंचालन श्रीमती एस पी वसावे,आभार प्रदर्शन श्रीमती व्ही ए पाटील यांनी केले.या प्रसंगीजेष्ठ शिक्षक  एस सी मराठे, सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल गुरव, ए.एन चौधरी, .राजीव चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख.रविंद्र गोसावी,श्रीमती.संगीता कलाल, मुख्य लिपिक  राहुलदेव पाठक , हेमंत सुर्यवंशी , श्यामप्रसाद आगळे श्रीमती देवकाबाई मराठे, किरण पावरा, आणि सर्व विद्यार्थी गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आदिवासी मुला मुलींनी आपली पारंपरिक वेशभूषा करून आपली लोककला नृत्यातून सादर केली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.