सातपुडा मिरर न्यूज
पूणे येथील Gyan-Key ग्रंथ चळवळ व ABP माझा TV चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वांतत्र्याची ७५ वर्षे व पुढील भविष्यात भारत कसा असेल या विषयी पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली यात आमच्या माध्यमिक विद्यालय तळवे ता.तळोदा शाळेतून 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पोस्टकार्ड पाठविले आणि आज ११ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबई येथून प्रसारीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी तळोदा तालुक्यातून एकमेव आणि नंदुरबार जिल्ह्यातून ४ शाळांची निवड झालेली आहे. लाईव्ह दुरदर्शनवर कार्यक्रमात माध्यमिक विद्यालय तळवे शाळेला या माध्यमाने सहभागाची संधी मिळाली आहे . ही एक यशस्वी निवड आहे . .ABP + Gyan-key library + asymmetrical च्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या अमृतमहोत्सवी स्वतंत्र भारत या उपक्रमात शाळेची मुंबईमध्ये आज ११ तारखेला होणाऱ्या ABP च्या लाइव्ह कार्यक्रमासाठी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
या साठी उपक्रमशील शिक्षक रामकुमार सूर्यवंशी यांचीही समन्वयक पदी शाळेतर्फे निवड होवून त्यांच्या समवेत प्रदीप निकम विद्यार्थ्यांला या कार्यक्रमास सहभागी होता आले . या निवडीबाबत संस्थाध्यक्ष चेतन पवार आणि ज्यांचा प्रमुख योगदानामुळे हे शक्य झाले असे शाळेचे मुख्याध्यापक निमेशदादा सूर्यवंशी सह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद तसेच ग्रामस्थ ' पालक यांनी अभिनंदन केले आहे .