Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा घेतला क्लास

तळोदा दि ११( प्रतिनिधी) नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांनी तळोदा तालुक्यातील गावांना भेटी देत विविध विभागांच्या कामांची पाहणी केली.यावेळी त्यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या असून त्यानुसार कार्यवाही करण्याचे सांगितले आहे.
         नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांनी तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल, इच्छागव्हाण,वाल्हेरी पुनर्वसन, नर्मदानगर या गावांना भेटी दिल्या. 
         या प्रसंगी त्यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राजेंद्र पाटील,पाणीपुरवठा व जलजीवन मिशनचे कार्यकारी अभियंता  श्री बाविस्कर, तळोदा पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री पी पी कोकणी गटशिक्षणाधिकारी, गटशिक्षाधिकारी शेखर धनगर,एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री वाघ,सहाय्यक गट विकास अधिकारी श्री पवार विस्ताराधिकारी डी डी मोहिते,आदी उपस्थित होते.
        गणेश बुधावल येथे त्यांनी ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा, प्रा.आ .उपकेंद्र, अंगणवाडी, ला भेट दिली.या प्रसंगी त्यांनी आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाअंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे  मेरी मिट्टी मेरा देश, अभियान राबविणेबाबत शिलाफलक पाहणी, अमृत वाटीका, पंचप्राण शपथ, वृक्ष लागवड इ. कार्यक्रम राबविण्यात आले.यावेळी लोकनियुक्त सरपंच लक्ष्मीबाई अजमेर नाईक, उपसरपंच मंगलसिंग पाटील, ग्रामविकास अधिकारी हारसिंग पावरा,माजी जि. प. सदस्य गणेश चौधरी, पोलीस पाटील मंगलसिंग पाडवी, डॉ.बोरसे, ग्रा. पं. सदस्य,उपस्थित होते.
          जिल्हा परिषद सीईओंची तळोदा तालुक्यातील गावांना भेटी
गणेश बुधावल येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या घेतला वर्ग घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमतांची चाचपणी करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी त्यांनी समजून घेतली.यावेळी विद्यार्थ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
          या दौऱ्यात वाल्हेरी व देवमोगरा पुनर्वसन तसेच इच्छागव्हाण येथे भेट देऊन देखील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायत यांची पाहणी केली यावेळी त्यांनी सर्व ठिकाणी माता मृत्यू बालमृत्यू व अर्भक मृत्यू होणार नाही यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहणे गरजेचे असून त्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशा सूचना दिल्या याशिवाय जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या लेखन वाचन सारख्या मूलभूत क्षमता प्राप्त करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी दिल्या अंगणवाडीना भेटी देऊन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिला सकस पोषण आहार मिळावा व विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमतासाठी प्रयत्न केले जावे अशा करण्याची अपेक्षा व्यक्त केली.