नंदुरबार दि १ (प्रतिनिधी) सरासरीपेक्षा २५% पाऊस झाला असल्यामुळे जिल्हा दुष्काळी जाहीर करणेबाबत अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे .यासाठी संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुपडू खेडकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सहसचिव रामदास मोरे, राष्ट्रीय सदस्य जयंतीलाल खेडकर, राष्ट्रीय सदस्य रामकृष्ण मोरे, राज्य सदस्य तुकाराम लांबोळे, काशिनाथ खेडकर यांनी निवेदन दिले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना आज देण्यात आले.
जिल्हयांत पावसाळाच्या सुरूवाती पासुनच पर्जन्यवृष्टी कमी झाली आहे. परीणामी शेतातील जमीनीत पुरेसा ओलावा नाही. त्यामुळे पाण्याअभावी पीके करपुन गेली आहेत. गांव, वस्तीत पाण्याचा अभाव आहे. जंगलात देखील गुरा-ढोरांना प्यायला पाणी नाही व खायला चारा नाही.
जिल्ह्यात बहुतांश ज्वारी, बाजरी, मुंग, उडीद, कापुस, सोयाबीन आदि पीके घेतली जातात. मुबलक प्रमाणांत पाऊस नसल्यामुळे, पाणी टंचाई निर्माण होऊन शेतीतुन पीकांचे उत्पन्न येण्याची आशा मावळली आहे.
निसर्गाच्या असमतोल लहरीपणामुळे शेतकरी बांधव नेहमी संकटांत सापडत असतो.हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार देखील इकडील परीसरात मुबलक पाऊस पडण्याची खात्री नाही. सद्यास्थीतीत नुकतेच नापिकी व दुष्काळी परीस्थीतीला कंटाळुन आसाणे येथील शेतकरी रोहीदास ओंकार पाटील या बांधवाने शेतातच गळफास घेऊन अखेर आपली जीवनयात्रा संपविली. एकंदरीत जिल्हयात सरासरीच्या तुलनेत २५% पाऊस झालेला आहे. पाऊसप्रभावी पाणी टंचाई व दुष्काळग्रस्थ परीस्थीती निर्माण झाली असल्याने नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करण्यात यावा अशी मागणी अखील भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या नंदुरबार जिल्हाशाखेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.