🌹हातात मोगरा अन् डोळ्यात प्रेम आहे 🌹
हातात मोगरा अन डोळ्यात प्रेम आहे
ह्रदयातल्या विणेचा झंकार सेम आहे !
रांगेत दूर आहे बसलीस शेवटीला
रोखून पाहते ती कातील नेम आहे !
लोकांस मानते ती आदर्श लोकशाही
पण हाय! माणसाचा होतोच गेम आहे!
पाहून वाट मी गं वाळून पार गेलो
सांगेल कोण मजला तू कुशल क्षेम आहे!
विझतील सूर्य त्यांचे ज्यांच्यात आग नाही
स्वार्थात पेटलेली नकलीच फ्लेम आहे!
देवेंद्र जोशी
यवतमाळ
मो. 98227 29855
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=