Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बारा वर्षे रखडलेल्या धडगाव तालुक्यातील उदय नदीवरील पुलाचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मार्गी लावला

बारा वर्षे रखडलेल्या धडगाव तालुक्यातील उदय नदीवरील पुलाचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मार्गी लावला 
     धडगाव दि (प्रतिनिधी) 45 कोटी रुपये निधी देऊन धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासाचा टप्पा पूढे नेला आहे.
     धडगाव तालुक्यातील बिलगाव आणि सावऱ्या दिगर गावांना जोडणारा आदिवासी समाज बांधवांसाठी दळणवळण करीता महत्त्वाचा उदय नदीवरील पूल मागील दहा ते बारा वर्षापासून अपूर्ण अवस्थेत रखडला होता, दरम्यानच्या काळात नंदुरबार जिल्हाला आदिवासी विकास मंत्रीपद असताना देखील त्या कामाला निधी मिळू शकला नव्हता.

शासन दरबारी असंख्य पाठपुरावा केल्यानंतरही निधी अभावी काम अपूर्ण अवस्थेत होते, दिनांक 15 जून 2023 रोजी नामदार उपमुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर श्री.अभिजीत दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस नंदुरबार जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांनी ही बाब नामदार श्री.अजित दादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिली , तसेच या चर्चेतून सदर पुलाचे महत्त्व नामदार श्री.अजित दादा यांना समजले.
       दरम्यानच्या काळात नामदार श्री.अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ खाते आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर श्री अभिजीत दादा मोरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सिताराम पावरा यांनी नामदार श्री.अजित दादा पवार यांच्याकडे पुनश्च या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवला, त्या पाठपुरावास प्रतिसाद देत नामदार श्री अजित दादा पवार यांनी त्वरित 45 कोटीचा निधी या उदय नदीच्या पुलासाठी मंजूर करून लवकरात लवकर सदर पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सुचना संबंधित विभागाच्या अधिकारी यांना दिल्या.
   त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर श्री.अभिजीत दादा मोरे यांनी नामदार श्री अजित दादा पवार यांची देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी मुंबई येथे भेट घेऊन धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार व्यक्त केले.
डॉ अभिजीत दिलीपराव मोरे
 जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हा