उल्हासनगर दि२ (प्रतिनिधी) टी.एम.जी. क्रिएशन्स पनवेल यांच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात संपन्न झालेल्या उत्तुंग भरारी पुरस्कार सोहळा तसेच जिस देशमें गंगा बहती है हा देशभक्तीपर कराओके गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्यात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्य,ध्येयनिष्ठ,प्रामाणिकपणा,त्यागपूर्ण व सकारात्मक दृष्टिकोन तसेच देशाचे स्वातंत्र्य,समता,बंधुता,धर्मनिरपेक्षता,
एकात्मता टिकविण्यासाठी व स्वावलंबी समाज घडविण्यासाठी केलेल्या बहुमोल योगदानाबद्दल उल्हासनगर येथील लोकसेवक,साहित्यिक,लेखक व कवी,मुंबई माळी समाज मंडळाचे अध्यक्ष तसेच ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातील सेवानिवृत्त डॉ.प्रा.प्रकाश माळी सर यांना *राष्ट्रीय अमरदीप रत्न सन्मान पुरस्कार २०२३* मा.दिपक जाधव राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षक,कारगिल हिरो मा.राजू पाटील एनसीसी कमांडो व अध्यक्ष सैनिकी फौंडेशन आणि मा.मोहन बडगुजर अध्यक्ष आयकॉन फौंडेशन इंडिया यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.याप्रसंगी सुप्रसिद्ध गिटारिस्ट मंगेश कदम,गीतकार व संगीतकार शैलेंद्र पवार,एन.डी. खान,विजय मोरे व सौ.सलमा खान उपस्थित होते.