🌹विटा घराच्या निखळतात हल्ली🌹
किती रोज अर्जून तरतात हल्ली
खऱ्या एकलव्यास नडतात हल्ली
तरी शब्द माझेच वाफाळलेले
मनी आग ज्वाळा उसळतात हल्ली
नको पावसा जीव घेण्यास येऊ
किती झोपड्या ह्या शरमतात हल्ली
कुठे लिंपला काल कच्चा गिलावा
विटा का घराच्या निखळतात हल्ली
भरडणार आहेत जात्यातले पण
सुपातिल खळाळून हसतात हल्ली
अनिता खैरनार
शिरपूर ( धुळे)
मो. 9822856083
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=