नंदूरबार दि ३ (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून, दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी ते धुळेहुन नंदुरबारला येणार असून दुपारी 3 वाजेच्या दरम्यान त्यांचे धुळे चौफुली येथे आगमन होणार आहे, दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी यूवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या जगताप वाडीतील जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करतील, यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, पक्षात प्रवेश करणा-यांचा सत्कार करतील ,सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान शहादाकडे दरम्यान प्रयाण करतील, शहादा शहरातील शिवस्मारक येथे आगमन सायंकाळी सहा, सव्वा सहा वाजेच्या दरम्यान आगमन व शहादा शहरातील बचपन स्कूल या ठिकाणी शेतकरी प्रतिष्ठित नागरिक विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधतील, त्यानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, रात्री साडेसात ते नऊ हा त्यांचा राखीव कार्यक्रम ठेवण्यात आला असल्याची माहिती, नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष नितीन जगताप यांनी दिली असून, त्यांच्या या नियोजित दौऱ्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी कळविले आहे.