Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार राजेश पाडवी यांचे तळोदा तालुक्यातील महिला भगिनींना रक्षाबंधन भेट, समस्या निराकरणसाठी महिला जनता दरबाराचे आयोजन

आमदार राजेश पाडवी यांचे तळोदा तालुक्यातील महिला भगिनींना रक्षाबंधन भेट, समस्या निराकरणसाठी महिला जनता दरबाराचे आयोजन

  तळोदा दि ३(प्रतिनिधी) रक्षाबंधन निमित्ताने माता-भगिनींच्या समस्या जाणुन सोडविण्यासाठी आपल्या हक्काचे आमदार राजेशदादा पाडवी यांचा महिला जनता दरबार आयोजित करण्यात येत आहे . महिलांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
        महिला बचत गट बाबत समस्या,पोलीस विभागातील समस्या,संजय गांधी निराधार योजने संदर्भात समस्या,तहसील कार्यालयातील समस्या,रेशनकार्ड संदर्भात समस्या,वीज वितरण कंपनी बाबत समस्या,नगरपालिका समदर्भात समस्या,प्रांतकार्यालयातील प्रलंबित समस्या,प्रकल्प कार्यालयातील प्रलंबित समस्या,आरोग्य विभाग बाबत समस्या,पंचायत समिती संदर्भात समस्या,घरकुल योजना समस्या..
इतर विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वच विभागातील अधिकारी,विभागप्रमुख देखील उपस्थित राहतील व आमदार राजेशदादा पाडवी यांचा सुचनेनुसार आपल्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
          तरी तालुक्यातील व शहरातील माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या आपल्या समस्या सोडविण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
ठिकाण:- माळी समाज मंगलकार्यालय हातोडा रोड,तळोदा
दिनांक:- 05/09/2023
वार:- मंगळवार
वेळ:-सकाळी 10 वाजता