तळोदा दि ३ ( प्रतिनिधी ) दलेलपुर ता तळोदा येथील शेत शिवारात शिवारात आज दि ३ रोजी पुन्हा बिबट्याने हल्ला करत दोन शेळ्या ठार केल्या आहेत.बिबट्यांचा तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात माणसांवर व पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यात वाढ झाली असून वनविभागाने डोळ्यावर पट्टी आणि कानावर हात ठेवले आहेत.
दलेलपुर शिवारातील हलालपुर रस्त्यावरील राजाराम रामराजे यांच्या शेतात दलेलपुरच्या किशोर धानका व जानेश धानका आपल्या शेळ्या चारण्यासाठी गेले होते. दलेलपुर शिवारात बिबट्या आणि अस्वलाचा वावर कायम असल्याने ते कधी माणसावर तर कधी जनावरांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे.आज देखील बिबट्याने दोन शेळ्यांवर हल्ला करत त्यांना ठार केले आहे.किशोर धानका व जानेश धानका यांच्या दोन शेळ्या बिबट्याने हल्ला करून ठार केल्याने शेत शिवारात काम करणाऱ्यांत भितीचे वातावरण आहे. पंधरा दिवसांत हल्ल्याची तिसरी घटना घडली आहे.वनविभाग घटना घडली की,कागदे रंगवण्याचे काम करत शासनाच्या मदतीचे अमिष दाखवत असल्याची गावकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. मूले,माणसे आणि जनावरांवर हल्ले होत असताना वनविभाग कागदी कारवाईत मश्गूल आहे . ग्रामीण भागातुन बिबट जेरबंद,अस्वल यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. वनविभाग कधी ठोस कारवाई करेल आणि माणसे, जनावरे कधी सुरक्षित , भयमुक्त होतील असा प्रश्न शेतकरी , शेतमजूर बांधव, व पशुपालकांनी उपस्थित केला आहे. पशु तर कधी मानवावर हल्ल्याकरुन बिबट्याने शिवारात थरार निर्माण करत. तालुक्यात कमालीची भिती पसरलेली आहे.वनविभागाने बंदोबस्तासाठी कृतीयुक्त पावले उचलावी अशी मागणी तालुक्यातील ग्रामीण भागातुन केली आहे.