सौ मनिषा सगरे यांच्या वाढदिवसानिमित्त टोकरे कोळी युवा मंचच्या माध्यमातून दिव्यांगास व्हीलचेअर भेट, माणुसकीचे दर्शन
शहादा दि ३ (प्रतिनिधी)अण्णा शिवदास सूर्यवंशी, रा. गोदिपुर पो.ब्राह्मणपुरी, ता.शहादा, जि.नंदुरबार हे दिव्यांग असून त्याला मदतीचा हात म्हणून सौ.मनिषा शंकर (भोला ) सगरे यांच्या वाढदिवसानिमित्त व्हीलचेअर भेट देण्यात आली.
नितीनभाऊ कोळी (वाहतूक नियंत्रक, शहादा आगार) यांना दिव्यांग अण्णा सूर्यवंशी यांच्याबद्दल समजल्यावर सुरेश राजपूत यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन व्हीलचेअरची व्यवस्था करण्यासाठी संपर्क करायला सुरुवात केली. दरम्यान शंकर (भोला) सगरे (वाहतूक नियंत्रक, धुळे आगार) यांना अण्णा सूर्यवंशी या दिव्यांगाबद्दल सांगितल्यावर त्यांनी तात्काळ व्हीलचेअर उपलब्ध करून दिली.
आज सौ.मनीषा शंकर (भोला) सगरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिव्यांग अण्णा यास व्हील चेअर देत माणुसकी चे दर्शन घडले.. या व्हीलचेअरने त्यांच्या शारीरिक अक्षमतेमुळे थांबलेल्या आयुष्याला नक्कीच गती प्राप्त होईल. अशी अपेक्षा व्यक्त केली .
व्हीलचेअर सुपूर्द करतेवेळी नितिनभाऊ कोळी, चेतन शिंदे, निलेश शिरसाठ, सुरेश राजपूत, आनंद सूर्यवंशी, शिवदास सूर्यवंशी व दिव्यांग अण्णा यांचे कुटुंब उपस्थित होते.
टोकरे कोळी युवा मंच, सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे