Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा शहरालगत गुजरात हद्दीत बिबट्या पिंज-यात जेरबंद

तळोदा दि ६(प्रतिनिधी) तळोदा शहराच्या पुर्वेला गुजरात हद्दीतील उभद ता कुकरमूंडा जि तापी येथे गुजरात वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला असून त्याला बघण्यासाठी परीसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

               उभद परिसरात शेतकरी शेतमजूर यांना शेतशिवारात,सतत बिबट्याचा वावर आढळून येत होता.कधी पायांचे ठसे उमटलेले असतं,कधी डरकाळी दिल्याचा आवाज येत असे, ग्रामस्थांनी याबाबत गुजरात वनविभागाकडे तक्रार केली होती.तक्रारीची दखल घेत वनविभागाने बिबटसाठी पिंजरा लावून ठेवला होता .आज सकाळी शेतकरी शेतात जात असताना पिंजरात हालचाल दिसुन आली.ही वार्ता गावभर व परिसरात पसरली बघ्यांची गर्दी उसळली.या घटनेची माहिती कुकरमूंडा येथील वनाधिकारी यांना कळवली असता प्रितेश गावित यांच्या टिम घटनास्थळी दाखल झाली.सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून बिबट्याचा पिंजरा तालुक्याचा गावी कुकरमूंडा येथे हलविण्यात आला आहे.