मोलगी दि ६(प्रतिनिधी)
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मुळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक धरमसिंग तडवी तर अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक प्रतापसिंग तडवी होते.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेने परिसरातील विविध जिल्हा परिषद व आश्रम शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांना आमंत्रित केले व त्यांचा सत्कार करुन त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. त्यात आसमाताई तडवी, इरमा वसावे, रायसिंग पाडवी, नरेन्द्रसिंग पाडवी या सेवानिवृत्त शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पूर्वराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षिका मनीषा वसावे यांनी केली. तसेच शाळेचे प्रिंसिपल गोटूसिंग वळवी यांनी शिक्षक दिनाविषयी शिक्षकाचे विविध पैलू स्पष्ट केले.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतापसिंग तडवी यांनी विविध विषयावर मार्गदर्शन करत त्यांचे शालेय अनुभव अतिशय विनोदी शैलीत प्रकट केले. तसेच या शिक्षक दिनी वत्कृत्व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. पहिल्या गटातील श्रेयश सुनिल पाडवी प्रथम व द्वितीय सनिकेत संजय अहिरे तर तृतीय क्रमांक सत्यम भरत वळवी याने पटकावला. आणि दुसऱ्या गटात किंजल निलेश वळवी प्रथम व द्वितीय विहान अमरसिंग वसावे तर तृतीय क्रमांक सार्थक अविनाश वसावे याने पटकावला. आणि तृतीय गटात किंजल नारसिंग वळवी प्रथम व द्वितीय आदर्शा सुरूपसिंग वळवी तर श्रुष्टि श्रावण वळवी हिने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रा. रविंद्र वानखेडे यांनी काम पाहिले. यशस्वीतांचे संस्थेतर्फे अभिनंदन करण्यात आले व पुढील उज्वल वाटचालीसाठी सुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका लीला पाडवी यांनी केले तर आभार शाळेचे व्हाईस प्रिंसिपल ईश्वर वसावे यांनी मानले.