🌹 प्रेमही करतो किती मोजून आपण🌹
फायदा नाही इथे वाचून आपण
राहिलो नुसतेच जर वाकून आपण
शुद्ध व्यापारामधे झाले रुपांतर
प्रेमही करतो किती मोजून आपण
देशभक्तीचा पुरे आवेश आता
जात नुसती घेतली माळून आपण
जेवलो नाही कधी ताटात एका
आज खातो घासही वाटून आपण
माणसे असतील दुसरी ठीक आहे
आपले शत्रू इथे आतून आपण
फक्त कानालाच जाते हाक ऐकू
ठेवले आहे हृदय कोंडून आपण
होत होत्या दंगली जातीमुळे अन्
आणली उपजातही ओढून आपण
सुजाता दरेकर (मेश्राम)
नागपूर
मो. 9420846450
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=