नवलपुर ता अक्कलकुवा येथे अस्वल दिवसाढवळ्या जंगलातून गावाच्या दिशेने येतात, शेतात काम करणाऱ्या एकट्या माणसावर हल्ला करून गंभीर जख्मी करतात.नुकतेच तीन अस्वल नवलपूर गावाच्या दिशेने येत होते.शेतात काम करणाऱ्या पाहीले आणि जंगलापर्यत हूसकून लावले. अस्वलाचा वनविभागाने बदोस्त करावा अशी मागणी होत आहे .
कामासाठी शेतात जाताना अस्वल अचानक पाठी मागे येवून त्याच्या हल्ला करुन डोक्यावर, छातीवर कमरे गंभीर जखमी केल्याचा दोन घटना घडल्या आहेत. पावसाची उघडीप असल्याने सर्वत्र शेतीची कामे सुरू आहेत.यांत कधी बिबट्या तर कधी अस्वलाचा हल्ल्याने तालुक्यातील शेतकरी व शेतमजूरांत भितीचे वातावरण आहे.आमदार राजेश पाडवी यांनी हिंस्र प्राण्यांचा प्रश्न विधानसभेत पावसाळी अधिवेशनात मांडला मात्रा मनुष्य सुरक्षित व भयमुक्त राहील असे कुठलेही ठोस उपाययोजना प्रशासनाने केलेली नाही.ग्रामीण भागातील जनता बिबट आणि अस्वलाचा भितीच्या सावटाखाली जीवन जगतो आहे.