अक्कलकुवा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक संपन्न
अक्कलकुवा दि ५ (प्रतिनिधी) राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.श्री अनिलदादा भाईदास पाटील व राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. सुरजभैय्या चव्हाण हे नंदुरबार दौऱ्यावर येणार असल्याने राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. अभिजीत दादा मोरे यांच्या आदेशानुसार आज शासकीय विश्राम गृह अक्कलकुवा येथे बैठक राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीची बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीला राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा,अक्कलकुवा-धडगाव विधानसभा अध्यक्ष ॲड.रुपसिंग वसावे, तालुकाध्यक्ष गजानन वसावे, महिला आघाडी च्या कार्याध्यक्ष संगीता पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष अलीम भाई, ज्येष्ठ नेते रानुलाल जैन, सामजिक कार्यकर्ते रवींद्र वळवी ,जिल्हा सचिव रामसिंग वसावे, वळवी,माजी युवक उपाध्यक्ष सागर वळवी, सामजिक कार्यकर्ते माकत्या वसावे , आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सरपंच देखील या बैठकीला उपस्थित होते त्यामुळे येणाऱ्या काळात मोठया प्रमाणात पक्षप्रवेश होण्याची शक्यता असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.