🌹रंग ताजा लावला 🌹
घाव त्याच्याही मुळावर माणसाने घातला
कोरड्याचा डाव म्हणुनी पावसाने खेळला
आंधळा विश्वास आता ठेवते आहे कुठे ?
ऐकते मी नेहमी आवाज माझ्या आतला
रोजचे जगणे जसे कंटाळवाणे वाटले
मी जुन्या पात्रास केवळ रंग ताजा लावला
अत्तराचा वास कायमचा कुठे टिकतो इथे
कष्टलेला देह आणिक गंध त्याचा चांगला
फाटला संसार इतका मार्ग झाले वेगळे
पण असू दे एक बिंदू मी तुझ्या परिघातला
बेल पानांच्या पुजेने देव कोठे भेटला ?
भावभक्ती अंतरीची पाहुनी तो पावला
भोवताली आपल्या तर चेहरे दिसती किती
कोण ढोंगी जाण तू अन् कोण आहे आपला
सौ स्नेहा शेवाळकर
पुसद जि. यवतमाळ
मो. 8329064755
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=