Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मोलगी ते काठी रस्त्याचे संरक्षण भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे-युवा सेनेचे जिल्हाधिकाऱ्याला निवेदन

मोलगी ते काठी रस्त्याचे संरक्षण भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे-युवा सेनेचे जिल्हाधिकाऱ्याला निवेदन
 -------------------------------------  
 अक्कलकुवा दि ४ (प्रतिनिधी ) अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी ते काठी रस्त्याचे संरक्षण भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.
           निवेदनात म्हटले की,मोलगी हे गाव बाजर पेठचे गाव असल्याने मोलगी या ठिकाणी अनेक खेड्यातील जोडलेले गाव आहेत या बाजारपेठेत येण्यासाठी नागरिक वाहनाने प्रवास करुन बाजारात येत असतात अशा परिस्थितीत रस्ते खारब असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अपघात देखील होत असतात ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासना मार्फत सदर रस्त्यावर अपघात होऊ नयेत म्हणून संरक्षण भिंत बनविण्याचे काम बांधकाम विभागामार्फत सुरु आहेत परंतु अतिशय नित्कृष्ट दर्जाचे बांधकाम सुरू असल्याने भविष्यात अपघात रोखण्यासाठी सदर होणारे काम हे दर्जेदार असायला पाहिजे परंतु तसे होतांना दिसत नाहीत फक्त नावालाच मलमपट्टी लावत आहेत म्हणून संबंधित बांधकाम करणाऱ्या यंत्रणेला आपले मार्फत ताकीद देण्यात यावी व सदर बांधकाम करणाऱ्या ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच कामात सुधारणा केली नाही तर संबंधित यंत्रणेच्या विरोधात त्या जागेवरच बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल यांची नोंद घेण्यात यावी.अश्या अश्यायाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले. निवेदन देतांना युवा सेना अक्कलकुवा तालुका प्रमुख जयंत पाडवी,रघुविरसिंग पाडवी,रतसिंग पाडवी ,खेमा वळवी,रंजित वळवी आधी कार्यकर्ते उपस्थित होते.