गोवंश हत्या, लव्ह जिहाद, लॅंड जिहाद, धर्मातरण विरुध्द , कायदा या मागणीसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा
चांदवड दि (प्रतिनिधी) चांदवड येथे कृषी उत्पन बाजार समितीच्या आवारात हिंदू जनआक्रोश मोर्चासाठी सकाळी दहा वाजेपासूनच मोर्चासाठी गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. चांदवड शहर संपूर्ण कडेकोट बंद होते. चांदवड शहराला पोलीसांच्या प्रचंड गर्दीमुळे छावणीचे स्वरुप आले होते.
कृषी उपन्न बाजार समितीच्या आवारात मोर्चेकरांनी भगव्या टोप्या व उपरणे परिधान करुन मोर्चास गर्दी केली होती. चांदवड शहरातील प्रमुख मार्ग वगळता इतर मार्गावर बॅरीकेटींग करण्यात आले.होते. ग्रामीण भागातील व चांदवड तालुक्यातील महिला बाल गोपाळ घोषणा देत मोर्चास्थळी विविध वेशभुषा करुन उपस्थित होते. सकाळी सव्वा अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीपासून मोर्चास प्रारंभ झाला. युवती वर्ग व महिला भगिनी मोर्चात भगव्या साड्या परिधान करुन व विविध फलक व भगवे ध्वज घेऊन सियावर रामचंद्र की जय!! छत्रपती शिवाजी महाराज की जय,!! धर्मवीर संभाजी महाराज की जय!! बोल बजरंग बली की जय!! सनातन वैदिक हिंदु धर्म की जय,!! भारत माता की जय!! वंदे मातरम!!! आदि घोषणा देत होते, मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती पासून निघुन पेट्रोलपंप चौफुली, सर्विस रोडने चिंचवन नगरपरिषद मार्गे श्रीरामरोड, शिवाजी चौक, सोमवार पेठ,आठवडेबाजार गणूर चौफुली, बसस्थानक मार्गे पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणावर सुमारे दोन तासाने पोहचला. मोर्चात आमदार नितेश राणे यांनी सहभाग नोंदविला. सर्वच पक्षाचे नेते सर्व हिंदु बांधव महिला भगिनी उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर कोणीही राजकीय पक्षाचे नेत्यांना प्रवेश दिला नव्हता. व्यासपीठावर धर्मसभेच्या वेळी चंद्रेश्वर गडाचे महंत स्वामी जयदेवपुरी महाराज, ह.भ.प. संग्राम बापु भंडारे, ह.भ.प.एकनाथ महाराज सदगीर, हर्षा ठाकूर समाधान पगार हे उपस्थित होते. यावेळी हर्षा ठाकूर यांनी लव जिहाद मध्ये हिंदू तरुणी कशा प्रकारे अडकविल्या जात आहे याबाबत घणाघाती टिका करून हिंदू भगिनींनी जिहाद मध्ये पडू नये असे आवाहन केले. तर चांदवड सारख्या देवदेवतांच्या वारसा असलेल्या शहरात पाकिस्तानच्या घोषणा दिल्या जातात ही शरमेची बाब असल्याचे सांगीतले. तर ह भ प संग्राम बापू भंडारे यांनी लँड जिहाद या विषयावर आपले सडेतोड विचार मांडले. तर हिंदु धर्म सनातन धर्म असून हा मोर्चा शांततेच्या मार्गानेच होणार आहे. त्यामुळे आज पोलीस प्रशासनच्या
चेह-यावर टेन्शन नाही. मात्र रावण प्रवृत्तीचे लोक हिंदु धर्माला कमजोर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आज ही भगवी पताका हिंदू बांधवाच्या खांद्यावर आहे वेळ पडल्यास त्या भगव्या पताकाची काठी हिंदु धर्म वाचविण्याकरीता उलटी करावी लागणार असल्याचे सांगुन भारत देश रामाचा देश आहे. तर जगाला सर्व हिंदुनी ओरडून सांगीतले पाहिजे की, हिंदुच देशावर कारभार करणार आहे. व भारत हिंदू राष्ट्रच राहणार आहे. हिंदुच्या जमीनीचे रक्षण करा, धार्मिक स्थळावरील जमीनीवर कोणी कब्जा करीत असेल तर त्यांचा फडशा पाडा असे आवाहन त्यांनी केले. तर ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर यांनी आपल्या भाषणात धर्मांतर का होतात या विषयावर मार्गदर्शन केले. हिंदु धर्म म्हणजे काय, जगामध्ये सर्वांना सांभाळणारा हिंदुच आहे. हिंदु समाज असंघटीत असल्याने अतिक्रमने होत आहेत. मात्र अनेक अतिक्रमने झाली त्यावेळी प्रतिकार करणं गरजेचे आहे. ती वेळ आजच्या मोर्चाच्या रुपाने आली आहे. मोर्चाचे वतीने विविध वेशभूषा केलेल्या बालगोपालाकडून चांदवडचे उपविभागीय अधिकारी देशमुख व तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मोर्चाच्या वतीने केलेल्या मागण्यामध्ये गोवंश हत्या, लव्ह जिहाद, लैंड जिहाद,धर्मातरण आणि अवैध प्रार्थना स्थळावरील भोग्यांनी उच्छाद मांडला आहे, हिंदु समाजाच्या लेकी, सुना कधी नव्हे एवढया असुरक्षीत झाल्या आहेत. कोणतीही हिंदु मुलगी अथवा महिला लव्ह जिहादला कोणत्या क्षणी बळी पडेल यांची शाश्वती राहीली नाही. बळी पडलेल्या मुलींची शेवटी निघृण हत्या केली जाते.
चांदवड तालुक्यातील हिंदुचे आराध्य दैवत श्री. चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात व बडनेर भैरव येथील धर्मीयांकडून अनाधिकृत अतिक्रमण करुन बिनदिक्कतपणी अवैध प्रार्थना स्थळे बांधली जात आहे. अशा गैरप्रकारामुळे हिंदु माता भगिनींना देव दर्शन घेणो दुरापास्त झाले आहे. या त्रासा बद्दल समजावून सांगण्यास गेल्यावर प्रत्येक वेळी अरेरावीच्या भाषेत शिवीगाळ करणे, मारहाण करणे असे प्रकार घडत आहे. चांदवड तालुक्यात वेगवेगळया सरकारी व वनहद्दीत अनाधिकृत दर्गाचे बांधकाम वाढत आहे. हिंदु साधुसंत तसेच जैन मुनींवर दिवसेंदिवस हल्ले वाढत आहे. आत्ताच देशाच्या स्वांतत्र्यदिनाचा कार्यक्रम चालु असतांना दि. १५ ऑगस्ट २३ रोजी काही धर्मांधांनी चांदवड टोल नाक्यावर ध्वजारोहन चालु असतांना पाकिस्तान जिंदाबाद घोषणा दिल्या अशा देशाविरुध्द कृत्य करणाऱ्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल न करणाऱ्या प्रशासनाविरोधात हा हिंदु जन आक्रोश मोर्चा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.असे स्पष्ट करण्यात आले.