कारू, लेह दि ४ सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क
त्रिशूल युद्ध संग्रहालयाच्या पायाभरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते संपन्न
महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने लडाखच्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी लेह येथील कारू येथे त्रिशूल युद्ध संग्रहालयाची पायाभरणी करण्याचा बहुमान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला. लेफ्टनंट जनरल रशिम बाली जी, GOC 3 इन्फंट्री डिव्हिजन मेजर जनरल पी.के. मिश्रा जी, कार्यकारी नगरसेवक स्टॅनझिन चोसफेल जी, आमदार श्रीकांत भारतीय आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्यलढ्यात देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या हुतात्म्यांना आणि स्वतंत्र भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना मी अभिवादन करतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
त्रिशूल युद्ध संग्रहालयाच्या बांधकामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 3 कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. या संग्रहालयासाठी आणखी निधीची गरज भासल्यास तोही उपलब्ध करून दिला जाईल.
९ हजार स्क्वेअर फूट परिसरात हे म्युझियम बनवले जाणार आहे. हे संग्रहालय त्रिशूलाच्या आकारात बांधण्यात येणार आहे. त्रिशूल युद्ध संग्रहालयाचे काम पुढील वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल. या संग्रहालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना लष्कराच्या कार्यपद्धती जाणून घेता येणार आहेत. त्रिशूल विभागातील 1962, 1965, 1971, 1991 च्या युद्धात आणि नुकत्याच झालेल्या ऑपरेशन स्नो लेपर्डमध्ये प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली म्हणून यामध्ये 3 प्रदर्शन हॉल असतील. मनाली महामार्गावरील स्थानामुळे हे संग्रहालय पर्यटन केंद्र म्हणूनही ओळखले जाईल.