सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि ८
खा डॉ हिनाताई गावित हे भारत सरकार तर्फे मेक्सिको मध्ये आयोजित करण्यात आलेल्या हवामान प्रदूषणावरील अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते.
मेक्सिको मध्ये हवामान ,प्रदूषण आणि त्या संबंधित विषयांवर काय काम करतात याची पाहणी करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.
भारत सरकार तर्फे खा डॉ हिनाताई गावित सोबत श्री_प्रद्युत_बोर्डोलोई,श्री_रितेश_पांडेय आणि कृष्णा_लावू हे खासदार सुद्धा या दौऱ्यात सामील झाले होते. भारत सरकारचे हे शिष्टमंडळ आणि भारताचे मेक्सिको मधील राजदूत श्री_डॉ_पंकज_शर्मा यांच्या समवेत हा अभ्यास दौरा पार पडला. विविध विषयांवर झालेल्या चर्चेत हवेचे प्रदूषण हा एक मुख्य विषय होता.
मेक्सिको ने त्यांच्या हवेच्या प्रदूषणाच्या समस्येवर शोधून काढलेली काही उत्तर थोडक्यात खाली देते आहे त्याप्रमाणेच आपणही आपल्या परिवहनाच्या बाबतीत थोडे बदल केले तर हवेच्या प्रदूषणावर मात करू शकतो मेक्सिको ने पाच उपाय शोधले आहेत ते याप्रमाणे सार्वजनिक परिवहणातून होणारं ,कमी_उत्सर्जन, हवेच्या गुणवत्तेचा दैनंदिन अंदाज, इको फ्रेंडली कला, सौर_पॅनेलचे एकत्रित नितंत्रण आणि स्वच्छ बाहेरील जागा.
मेक्सिको मधल्या हवेच्या प्रदूषणाबद्दलच्या अनेक गोष्टींची यावेळी माहिती घेतली आणि तशाच पद्धतीने भारतातही काही काम करता येईल का यावर खासदारांचीही व्यक्तिगत चर्चा झाली. आगामी काळात भारत सरकारकडून त्यावर उचललेली पावले निश्चितच बघायला मिळतील.असे डॉ हिनाताई गावित यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.