Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीताने तळोदा पोलिसांना गुंगारा देत पलायन केले,पोलिसांचा शोध सुरू

तळोदा दि ७ (ता प्र) शौचालयात जाण्याचा बहाणा करून वैद्यकीय तपासणी साठी रुग्णालयात नेलेल्या आरोपीताने पोलिसांच्या हातावर तुरी देत पोलिसांना गुंगारा देत पोबारा केला आहे.
          सविस्तर वृत्त असे की,सागर बंडु तारखले रा. तिसगाव ता. पाथर्डी जि .अहमदनगर याने अल्वपयीन मुलीस फुस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीतास पोलिसांनी आरोग्य तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात नेले होते.त्याठिकाणी शौचालयात जातो सांगून पोलिसांची दिशाभूल करत पोलिसांच्या हाती तुरी देत पोलिस कस्टडीतुन पळ काढल्याची घटना तळोदा शहरात घडली आहे.
         शहरातील एका १३ वर्षीय अल्प वयीन मुलगी हरवली असल्याची फिर्याद कुटुंबीयांकडून तळोदा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. सबधीत कुटुंबातील सदस्य दररोज पोलीस ठाण्यात येऊन आमच्या मुलगी,सापडली का? लवकर परत आणा या बाबत वेळोवेळी तगादा लावत होते. २१ ऑगस्ट रोजी हरवलेली तरुणीचा शोध बारामती जवळील खडके गावात लागला सदर मुलीस एक तरुण फुस लावून पळवून नेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी त्यास ताब्यात घेऊन तळोदा पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्याची आरोग्य तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले, वैद्यकीय तपासणी नंतर अतिरिक्त गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा अंदाज त्या तरुणास आला असावा,आरोपीला बुधवार दि ६ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात तळोदा येथे नेण्यात आले असता, त्याने शौचालयात जाण्याचा बहाणा करून पोलिसांच्या हातावर तुरी देत पोबारा केला. त्याने पळ काढल्याचा घटनेने रूग्णालय परिससरात एकच गोंधळ उडाला. . सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित कुमार बागुल यांच्याकडे आहे. आरोग्य तपासणी दरम्यान एक पोलीस कर्मचारी व एक हवालदार आरोपी सोबत असल्याच्या वृत्तास पोलिस ठाण्यातून दुजोरा देण्यात आला आहे. मात्र त्यांचे नाव सांगण्यास असमर्थता दर्शविली आहे. दरम्यान, रात्री पासून आठ ते दहा पोलीस कर्मचाऱ्यांनी तळोदा हद्दीत त्याचा कसून शोध घेतला. परिसरातील ऊस,कपाशी, पिकातही शोधले. लगतच्या गुजरात हद्दीपर्यंत जाऊन आले.मात्र संबधित तरुण गुरुवार पावेतो कुठेही आधळून आला नाही.याबाबत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देण्याच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. मात्र पोलीस त्यांना शोधण्यात यशस्वी झाली आहे. मात्र २४ तास उलटूनही आरोपी सापडत नसल्याने पोलीस कर्मचारी देखील हतबल झालेले दिसून आले.