Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उभद येथे पिंज-यात अडकलेला बिबट्या,शिकार शोधत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

तळोदा दि ६ ( प्रतिनिधी) तळोदा शहराच्या पुर्वेला गुजरात हद्दीतील उभद ता. कुकरमूंडा जि तापी येथे गुजरात वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला.त्याआधी तो भक्ष्याचा शोधात फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.सदर बिबट्यास चार दिवसांपुर्वी जेरबंद करून गूजराथ वनविभागाने नेले आहे.

               उभद परिसरात शेतकरी शेतमजूर यांना शेतशिवारात,सतत बिबट्याचा वावर आढळून येत होता.कधी पायांचे ठसे उमटलेले असतं,कधी डरकाळी दिल्याचा आवाज येत असे, ग्रामस्थांनी याबाबत गुजरात वनविभागाकडे तक्रार केली . वनविभागाने उभद येथील रती डेपोजवळ पिंजरा लावला होता.शिकारीच्या शोधात फिरत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे . नंतर स्वतःच पिंज-यात अडकल्याचे सकाळी दिसून आले.