Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा तालुका मुख्याध्यापक संघ सहविचार सभा संपन्न

तळोदा तालुका मुख्याध्यापक संघ सहविचार सभा संपन्न

आज दिनांक ८ सप्टेंबर २३ रोजी नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिर तळोदा येथे मा.गटशिक्षणाधिकारी श्री शेखर धनगर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविक संघाचे तालुकाध्यक्ष श्री निमेशदादा सुर्यवंशी यांनी केले. सभेच्या सुरवातीला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. रवींद्र गुरव , सेवानिवृत्त प्राचार्य श्री. अजित टवाळे , मुख्याध्यापक श्री. सी.एम.पाटील व जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त श्री.सुनिल परदेशी  यांचा सत्कार करण्यात आला. मा.गटशिक्षणाधिकारी यांनी विविध शैक्षणिक योजनेचा आढावा घेतला तसेच मानव विकास मिशन योजना,सेवा हमी कायदा, विद्यार्थ्याच्या नावात ,जन्म तारखेत बदल करणे. अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. शिक्षण विस्तार अधिकारी श्री वसंत जाधव यांनी MDM, सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती, मोफत पाठ्यपस्तके योजना यांचे रेकॉर्ड कसे ठेवावे याविषयी मार्गदर्शन केले याप्रसंगी तालुका मुख्याध्यापक संघाची नविन कार्यकारीणी गठित करण्यात आली. याप्रसंगी भास्कर मराठे,भरत पाटील, योगेश पाटील,किसन बारेला,संजय बागुल, शेरसिंग पाडवी, नरोत्तम मराठे , निलेश सूर्यवंशी आदी मुख्याध्यापक उपस्थित होते.  एन.व्ही.मराठे यांनी आभार मानले.
 *तळोदा तालुका मुख्याध्यापक संघ नवीन कार्यकारिणी 2023-24* 
 *अध्यक्ष* -श्री.निमेश विष्णुपंत सुर्यवंशी 
 *सचिव* - श्री.सुनिल सुदाम परदेशी
 *उपाध्यक्ष* -श्री.भास्कर दत्तूमराठे
 *उपाध्यक्ष* - श्री.योगेश संजय पाटील 
 *कोषाध्यक्ष* -श्री.भरत उध्दव पाटील
 *विद्यासचिव* श्री.निलेश जीवन सुर्यवंशी
 *ऑडिटर* -श्री.संजय भिका बागुल 
 *प्रसिध्दीप्रमुख* श्री.किसन संपत बारेला
 *सहसचिव* -श्री.नरोत्तम वामन मराठे
 *सहविद्यासचिव* -श्री.शेरसिंग गणपतसिग पाडवी
 *सहकोष्याध्यक्ष* -श्री.कालुसिग मोग्या पाडवी
 *आश्रमशाळा प्रतिनिधी* -श्री.प्रकाश ढोमण साळुंखे 
 *महिला प्रतिनिधी* -श्रीमती.प्रतिभा देवाजी मराठे
 *कार्यकारिणी सदस्य* -शेख इकबाल शेख उमर,शेख इस्माईल शेख गणी पिंजारी 
 *सल्लागार* -श्री.अजित हिरालाल टवाळे , श्री.छोटु मंगा पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापक