Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्वप्नामध्ये रमते आहे

• आजची गझल •    (भाग ७४ )

🌹स्वप्नामध्ये रमते आहे🌹

 तुला सोडुनी जगताना मी तुझ्याचसोबत जगते आहे
आठवणींच्या हिंदोळ्यावर तुझ्याचसोबत झुलते आहे

देशासाठी शहीद होणे स्वप्न तुझे ते सुंदर होते 
आजकाल मी सत्याहुनही स्वप्नामध्ये रमते आहे

नकोत आता विजयी गाथा नकाच वाहू अश्रूधारा 
झेंड्याखाली देह तुझा तो पाहुन छाती फुलते आहे

आयुष्याचे सोने झाले देश रक्षण्या देह झिजवला
तुझ्याविना पण तुझ्या फुलांचे फुलणे मनास सलते आहे

हवा कशाला मंद मोगरा नको बिचारा अबोल चाफा
तुझ्याजवळच्या धुंद क्षणांना मनात माझ्या जपते आहे

खुशाल जाते कार्यक्रमाला नट्टापट्टा करून सारा
तुझे गोडवे गाताना जग मलाच वेडी म्हणते आहे

जसे मनाला बरे वाटते तसे क्षणांचे धागे विणते 
आनंदाचे मनासारखे जग मनातले रुचते आहे

सौ. नेहा महाजन 
सोलापूर
मो. 99229 95255

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=