Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पान पान आठवणींचे झडले

• आजची गझल •    (भाग ७२ )

🌹पान-पान आठवणींचे झडले 🌹

सारे काही मनासारखे घडले आहे
फळ प्रेमाचे पदरामध्ये पडले आहे

इलाज नाही होरपळीवर त्या छायेच्या
ज्या छायेचे प्रेम उन्हावर जडले आहे

नकोस काढू पुन्हा आठवण त्या भेटीची
ज्या भेटीने ह्रदय आजवर रडले आहे

कशास आता मोहामध्ये तू गुंतवते
पान-पान जर आठवणींचे झडले आहे

मने जुळुनही का न भेटलो याचे उत्तर 
मौनामध्ये या काळाच्या दडले आहे

काशिनाथ गवळी
नांदगाव, नाशिक
मो. ९८५०४४१२८७, ९८३४७६१७१४ 

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=