Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सीईओ सावनकुमार यांची सोमावल येथे भेट

'संकल्प संस्थेत बाळंतपणाचा निश्चय बालक सुरक्षेचा' आरोग्य विभागाचे 'मिशन 84 दिवस' निमित्त सीईओ सावनकुमार यांची सोमावल येथे भेट 

  तळोदा दि ७ (प्रतिनिधी)  सीईओ जि. प. नंदुरबार श्री. सावन कुमार साहेब यांनी मिशन 84 दिवस बाबत पडताळणी साठी दि ६ रोजी आरोग्य वर्धिनी केंद्र सोमावल येथे भेट दिली. OPD तसेच IPD तील दाखल रुग्णांसोबत संवाद साधला. दैनंदिन कामकाज,  प्रसूतीगृह, परिसर याबाबत पाहणी केली. मिशन 84दिवस बाबत आशांचा आढावा घेतला. मा. CEO सरांनी आ. व. केंद्र सोमावल यांच्या कामाबद्दल खूप समाधान व्यक्त केले व  वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले.
             भेटीदरम्यान 15 ANC माता नियमित पाठपुरावा करण्यासाठी उपस्थित होत्या आणि 02 मातांना एका दिवसाच्या PNC वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते.इतर कारणांचे आणखी 05 रुग्ण IV द्रवपदार्थांवर होते.CEO यांनी PHC सोमावलच्या सर्व टीम सदस्यांचे कौतुक केले.
         ०७ गरोदर माता यांना लोहाचे सुक्रोज इंजेक्शन,(रक्तगती) सलाईनद्वारे सुरू होते.बाह्य रुग्ण ९० जणांवर उपचार करण्यात आले.तालुक्यातील माता मृत्यू ,बालमृत्यू यांचे प्रमाण इतर  प्रमाणापेक्षा अधिक आहे व तसेच संस्थात्मक प्रसूतीदेखील कमी आहे. त्या अनुषंगाने मृत्यू दर कमी करणे व संस्थात्मक प्रसूती  वाढवण्याच्या दृष्टीने   तालुक्यात मिशन 84 डेज (संकल्प 84) दिवसाचा सुरक्षित आरोग्य संस्थेत बाळतपणाचा कार्यक्रम एक सप्टेंबर 2023 पासून  राबवण्यात आला आहे.
         संकल्प 84 दिवसाचा सुरक्षित आरोग्य संस्थेत बाळंतपणाचा या कार्यक्रमात आशा, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी 42 दिवस प्रस्तुतीपूर्व गरोदर मातांना व  42 दिवस प्रसूतीपश्चात स्तनदा माता व बालकांना भेटी देऊन सेवा देणार आहेत .
           संकल्प संस्थेत बाळंततपणाचा निश्चय बालक सुरक्षेचा  या मोहिमेसाठी तळोदा तालुका आरोग्य विभाग सज्ज झाला असून याकामी तालुका आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्रनिहाय समुदाय आरोग्य अधिकारी ,आरोग्यसेविका, आशा, आशा गटप्रवर्तक यांच्या बैठका घेण्यात येऊन नियोजनबद्ध कामे सुरू आहेत.