तळोदा दि ७ (प्रतिनिधी) तळोदा तालुक्यातील तालुक्यात विविध योजनेतून मंजूर विकास कामाचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यात प्रामुख्याने तळवे पाडळपूर, सलसाडी, दसवड येथे रस्ते काम, तळवे येथे तलाठी भवन, व बौद्ध विहार, प्रतापपूर येथे पुलाचे काम तर रोषमाळ धडगाव कोठार तळोदा रस्ता रा मा ८ कि मी ७२/०० ते ७५/१७५ अश्या महत्त्वपूर्ण कामाचे समावेश आहे.
तळोदा तालुक्यात विकास कामांचा सपाटा सुरू असून आमदार राजेश पाडवी यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होत आहे. गोकुळष्टमीचे औचित्य साधत आमदार राजेश पाडवी यांच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत अर्थ संकल्प व स्थानिक आमदार निधीतून रस्ते काम व बौद्ध विहार या सोबतच आदिवासी उपाययोजना अंतर्गत तलाठी भवन, तर प्रतापपुर येथे पुलाचे कामाचे भूमीपुजन अश्या महत्वपूर्ण कामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सा.बा विभागाचे उप अभियंता नितीन वसावे नगरसेवक सुभाष चौधरी, गौरव वाणी, जितेंद्र सुर्यवंशी, नारायण ठाकरे, दारासिंग पाडवी, राजू भोई, चुडामन मराठे, अनिल भोई, शाखा अभियंता सुधाकर चौरे, बागले, तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, माजी जि.प सदस्य जितेंद्र वळवी, महेंद्र पाटील,सरपंच पंकज पावरा दारासिंग वसावे, सिलिंगपूर येथील सरपंच रायसिंग मोरे, महेंद्र पटेल, तळवे सरपंच मोग्या भिल, उपसरपंच ताराचंद शिंदे, सदस्य दिपक ठाकरे, सतीश साळुंखे, शांतीलाल पाटील, पुनमचंद वळवी, नवनाथ ठाकरे, नावगाव सरपंच अशोक पाडवी, आमलाड सरपंच सत्यवान पाडवी, सलासाडी सरपंच शैलेश वळवी, मनोज वळवी, राजेश पाडवी, कुंवरसिंग पाडवी, निलेश ठाकरे, सुरेश केदार, सुनंदा केदार यांच्यासह सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
रोषमाळ धडगाव कोठार तळोदा सदर रस्ता १५ की.मी पावेतो मंजूर असून यामुळे या भागात दळन वळण सोयीस्कर होणार आहे. दोन तालुक्यांना जोडणारा हा रस्ता असून रुंदीकरण देखील या रस्त्याचे केले जाणार आहे. राज्यसिमा रोषमाळ धडगाव कोठार तळोदा रस्ता या कामास आमदार राजेश पाडवी यांच्या सततच्या पाठ पुराव्यामुळे मंजुरी मिळाली असून चीनोदा चौफुली लगत असलेल्या कोठार रस्त्याचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.