🌹अबोला🌹
कसा हा अबोला प्रियेचा कळेना अशी का मिटावी अधर पाकळी
किती म्लान झाले कमळही मुखाचे कुठे लोपली गोड हसरी खळी
तिच्या बडबडीची सवय या मनाला पसरली उदासी किती आगळी
सुकावा असा का फुलाचा बगीचा मुकी वाटते मोगर्याची कळी
छुप्या गूढ मौनात सल अंतरीचा नयन भासती वेदनांची तळी
सुचेना तिढा सोडवावा कसा मी कशी काय होईल ती मोकळी
दुरावा तिचा दाह करतो जिवाचा अवस्था जशी तडफडे मासळी
कळेना कसे आवरू भावनांना सखी वागते का अशी वेगळी
शशी हासतो बघ निशा पाहताना तशी प्रीत माझी खुळी बावळी
फुलू दे मुखावर तुझ्या चांदणे अन मिटू दे मनाची गर्द काजळी
डॉ. विजया नवले (झरकर )
पुणे
मो. 98228 49414
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=