Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जल जीवन मिशन अंतर्गत", "हर घर नल से जल" खापर गावाच्या पाणीपुरवठा योजने चे काम करणाऱ्या ठेकेदारा विरुद्ध तक्रार

खापर दि ८(प्रतिनिधी)"जल जीवन मिशन अंतर्गत", "हर घर नल से जल" या केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी योजने अंतर्गत सुरू असलेले खापर गावाच्या पाणीपुरवठा योजने चे काम करणाऱ्या ठेकेदारा विरुद्ध शिवसेना जिल्हाप्रमुख तथा विधानपरिषद सदस्य आमदार आमश्या पाडवी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमारजी गावित, खासदार डॉ. हिनाताई गावित, जिल्हा परीषद अध्यक्षा डॉ. सुप्रियाताई गावित यांना खापर ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या सर्व सदस्यांनी तक्रारी निवेदन दिले.
          यावेळी माजी उपसरपंच तथा ग्रा.पं.सदस्य व युवासेना जिल्हाप्रमूख ललितकुमार जाट, ग्रा.पं.सदस्य महेश पाडवी, आश्विन पाडवी, शोएब तेली उपस्थित होते.तर या व्यतिरिक्त ग्रा.पं.सदस्या निर्मलाबाई कोळी व अरुणाबाई पाडवी यांच्या देखील सह्या आहेत.सदर कामाच्या अंदाजपत्रकातील तरतुदी आणि इतर बाबींची सविस्तर माहिती ग्रामसभेतील ग्रामस्थांसमोर व लोकप्रिनिधींना देण्याचे वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार पत्र दिले गेल्या नंतरही संबंधित ठेकेदार सदर माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे.. तसेच कामाची प्रत्यक्ष परिस्थिती आणि कार्यालयाकडून मिळालेली माहिती याच्यात देखील तफावत आहे.. लोकप्रतनिधींना कामाच्या अंदाजपत्रकाची संपूर्ण माहिती असली तरच कामावर पूर्णतः लक्ष देऊ शकतात.. सदर काम ज्या ठेकेदाराला मिळालं आहे तो दुबईला राहत असून प्रत्यक्ष काम दुसराच ठेकेदार करत आहे.. पाणीपुरवठा हे प्रचंड किचकट प्रकारचे काम असून फार बारीक सारीक कामे याच्यात समाविष्ट केलेले असतात... तांत्रिकदृष्ट्या योग्य असणाऱ्या व्यक्ती आणि यंत्रणेकडूनच हे काम योग्य रीतीने होऊ शकते... अन्यथा यापूर्वी 2006-07 साली देखील एका ठेकेदाराने अश्याच पद्धतीने अर्ध- अपुरं काम करुन निघून गेला आणि नंतर त्याचा त्रास ग्रामस्थांना आणि त्यानंतर झालेल्या लोकप्रनिधींना झाला.आणि पाणीपुरवठा योजना एकदा पूर्ण झाल्यानंतर नवीन काम परत 25-30 वर्ष मंजूर होत नाही.. मी फार मोठया अडचणीतून नवीन पाणीपुरवठा करणारी तीन लाख लिटर क्षमतेची टाकी मंजूर करुन आणली होती.. आता परत एवेढी मोठी न भूतो न भविष्यती अशी योजना मंजूर झाली आहे तर ते काम शंभर टक्के योग्य पद्धतीने झाले पाहिजे.. यात जर काहीं तृट्या नजरचुकीने राहून गेल्या तर पुढच्या पिढीला याचा जो त्रास होईल तो न परवडणारा असेल... जेवढी मोठी योजना तेवढाच मोठा दुरुस्तीचा खर्च असेल.. तो उपलब्ध कुठून करायचा.. आणि नवीन योजना तर पुढचे 30-40वर्ष मंजूर होऊ शकणार नाही.. त्यामुळे आत्ताच सरपंच, उपसरपंच आणि आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील आजी-माजी लोकप्रतिनधी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील सुज्ञ नागरिक या सर्वांनी मिळून या कामावर संयुक्तपणे आपापली जबाबदारी समजून लक्ष देणे गरजेचे आहे आणि ते आपले कर्तव्य देखील आहे.. योजनेची व कामाची व्याप्ती मोठी असल्याने.. एवेढ्या मोठया कामावर एक व्यक्ती नजर ठेवू शकत नाही.. शेवटी हे काम आपल्या गावाच्या भवितव्याशी निगडित आहे. रस्ते व इतर बाबी दरवर्षी होऊ शकतात पण ही योजना पुन्हा पुन्हा होणार नाही.. म्हणुन आजच जर आपण ठेकेदारावर वचक ठेवून योग्य त्या गोष्टी करुन घेतल्या , सर्व सहित्य, साधन, सामग्री चांगल्या प्रतीची आणि दर्जेदार वापरली आणि गुणवत्तापूर्वक काम करुन घेतले. ...तर निश्चितच आपल्याला पुढील अनेक वर्ष चांगली सुविधा उपभोगता येईल आणि म्हणूनच एकट्या सरपंच किंवा ग्रा.पं. पदाधिकारी यांचीच ही जबाबदारी नसून आपण सर्वांनी त्यांना मदत करणे अपेक्षित आहे.. पण त्या आधी आपल्याला योजना, योजनेतील तरतुदी या सर्व बाबींची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे... आणि शासनाने देखील तश्या सूचना ठेकेदाराला दिलेल्या आहेत.. पण संबंधित ठेकेदार हा शासनाच्या पत्राला न जुमानता आपल्याला माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे... मागच्या दोन ग्रामसभेत आम्ही सूचना केल्या होत्या की संबंधित ठेकेदाराला ग्रामसभेत माहिती देण्यास सांगीतले जावे.. पण ग्रामसभेत सदर ठेकेदार उपस्थीत झाला नाही त्यानंतर संबंधित ठेकेदाराला ग्रामपंचायत कार्यालयात तरी येऊन माहिती द्यायला सांगा म्हणून ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामसभेचे संदर्भ देत पत्र देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या परंतु तसेही काहीं झाले नाही म्हणुन आज ग्रामविकास परिवर्तन पॅनल च्या निवडून आलेल्या सदस्यांच्या वतीने जिल्ह्यातील वरिष्ठ लोकप्रतिनधींना संबंधित ठेकेदारा विरोधात निवेदन देण्यात आले आहे .. येत्या आठ दिवसाच्या आत संबंधित ठेकेदाराने स्वतः संपर्क साधून ग्रा.पं. कार्यालयात सर्व सदस्यांना कामाबद्दल व अंदाजपत्रकातील तरतुदी बद्दल सविस्तर माहिती द्यावी.. आणि  संपूर्ण एक दिवस सर्व सदस्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष  कामाची पाहणी करत झालेलं काम दाखवावं... अन्यथा शिवसेनेच्या वतीने परत एक तक्रारी निवेदन देऊन काम बंद पाडण्यात येईल अश्या प्रकारचा इशार देण्यात आला आहे.. आमदार श्री.आमश्या दादा पाडवी यांनी या विषयात प्रत्यक्ष लक्ष घालणार असल्याचे सांगितले. तरी याबाबतीतली पुढील प्रक्रिया ग्रामस्थांना सोशल मीडिया द्वारे वेळोवेळी कळविण्यात येईल याची माहिती ललितकुमार  जाट
युवासेना नंदूरबार जिल्हाप्रमुख संयोजक व गटनेता-ग्रामविकास परिवर्तन पॅनल,माजी.उपसरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रा.पं.सदस्य खापर.यांनी दिली आहे.