Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माऊली हॉस्पीटल व प्रसूतीगृह आणि आदिशक्ती सप्तश्रृंगी माता ट्रस्ट संयुक्त विद्यमाने तळोदा येथे महिला रोगनिदान शिबीर संपन्न

माऊली हॉस्पीटल व प्रसूतीगृह आणि आदिशक्ती सप्तश्रृंगी माता ट्रस्ट संयुक्त विद्यमाने तळोदा येथे महिला रोगनिदान शिबीर संपन्न
तळोदा दि १९( प्रतिनिधी) येतील आदिशक्ती सप्तश्रृंगी माता ट्रस्ट आणि डॉ. किरण सूर्यवंशी याचे माऊली हॉस्पीटल व प्रसूतीगृह यांच्या संयूक्त विदयमाने मोफत महिला आरोग्य तपासणी तथा गर्भवती तपासणी शिबीर दि 17/10/23 मंगळवार रोजी संपन्न झाले. 
          शिबिरात प्रामुख्याने तळोदा व परिसरातील 107 महीलाची तपासणी करण्यात आली त्यापैकी 82 महीलांचे रक्त तपासणी मोफत केली त्यात हीमोग्लोबिन चे प्रमाण CBC, Blood group रक्तातील साखरेचे प्रमाण(dibetes) इ चाचण्या मोफत करण्यात आल्या. दरम्यान ३२ गर्भवती महिलांची तपासणी करून त्यांना योग्य तो उपचार व संस्थात्मक प्रसूती साठी मार्गदर्शन करण्यात आले आले.
          माऊली हॉस्पीटल व प्रसुती गृह येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. किरण सूर्यवंशी , एम एस (स्त्रीरोग प्रसूति तज्ञ) यांनी सर्व तपासणी केली त्यांचे सर्वत्र कौतूक होत असून हॉस्पिटल सुरु होऊन अवघे काही महीने झाले असुन तरी देखील परीसरातील गरजू साठी ते 24 तास अहोरात्र सेवा देत आहे आणि कमी कालावधीत लोकप्रीय झाले आहेत असेच शिबिरांचे आयोजन भविष्यातही होतील असे त्यांनी सांगीतले.