Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एकात्मिक बाल विकास प्रकल्प तळोदा तर्फे बोरद येथे पोषणमाहा अंतर्गत वनभाजी महोत्सव साजरा

तळोदा दि २ (प्रतिनिधी) एकात्मिक बाल विकास प्रकल्प तळोदा तर्फे बोरद येथे पोषणमाहा कार्यक्रम अंतर्गत वनभाजी महोत्सव साजरा करण्यात आला.
        कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच अनिता रविंद्र भिलाव,तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य सुनीता पवार, उपसरपंच नीलिमा जाधव, ग्रा.प सदस्य गायत्री भिलाव, लता पवार ज्योती साळवे, सामाजिक कार्यकर्ते भरत पवार, बालविकास प्रकल्प अधिकारी सागर वाघ, विस्तार अधिकारी गावित, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर अंतर्गत पोषण आहार जिल्हा समन्वयक संतोष मोरे, विनोद अडोकर, संदीप राजपूत, सपना पानपाटील यावेळी उपस्थित होते.

         या महोत्सवात वन भाज्यांचे आरोग्यासाठी असलेले फायदे याची सर्वांना माहिती व्हावी. तसेच जैवविविधतेचे संवर्धन होऊन नामशेष होणाऱ्या भाज्यांचे जतन व्हावे. यातून जल, जंगल, जमीन यांचे रक्षण होते. जंगल वाचावे यासाठी बोरद येथे वनभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
           अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जि. प सदस्य सुनिता पवार, भरत पवार, ललिता वळवी यांनी मार्गदर्शन केले .यावेळी केंद्रीय संचार ब्युरो ,भारत सरकार प्रतिनिधी,आप की जय कलापथक (अंमलपाडा) यांनी रोडालीतून जनजागृती केली.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना पानपाटील यांनी तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी बोरद येथील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी केले.शकीला ठाकरे यांनी आभार व्यक्त केले.