मोलगी दि २(प्रतिनिधी)
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मुळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूलचा ग्रीन डे शाळेत न साजरा करता उखळीपाडाच्या शेती क्षेत्रात यशस्वीरीत्या शाळेचे प्रिंसिपल गोटूसिंग वळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार साजरा आला.
ग्रीन डे हा लहान विद्यार्थ्यांचे मनोरंजन व त्यांना रंगाचा अभ्यास व्हावा या उद्धेशाने साजरा करण्यात येते. त्याप्रमाणे अल्फाबेट स्कूलचाही ग्रीन डे विद्यार्थ्यांना निसर्गाचा अभ्यास व्हावा यासाठी वेगवेगळे पिक, झाडे, गवत, व नदी असलेल्या परिसरास भेट दिली व तेथील नैसर्गिक घटकांविषयी माहिती देण्यात आली. क्षेत्रभेट व ग्रीन डे ची सुरुवात आदिवासी कुलदैवत याहा मोगी मातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर शाळेचे वॉइस प्रिंसिपल ईश्वर वसावे यांच्याद्वारे कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यात आली. शाळेच्या शिक्षिका लीला पाडवी व मनीषा वसावे यांनी बालकांना शेती, पीके, कडधान्ये, झाडे, नदी, नाले, दगड-दोंडे, गवत, पक्षी, प्राणी अश्या विविध नैसर्गिक घटकांविषयी माहिती दिली. त्यासबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळे खेळ खेळत मनोरंजनही करण्यात आले. सर्व विद्यार्थी व शिक्षक हिरव्या रंगाचे कपडे तसेच इतर शैक्षणिक साहित्यही तयार आणले व हिरव्या रंगाचे खाद्यपदार्थ, फळे व फुले इतर वस्तू तयार करुन स्पर्धेसाठी व्यवस्थीपणे मांडणी करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या वर्गशिक्षकांनी त्याचे मूल्यमापन केले. तसेच ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली व तेथील दैनंदिन कार्याविषयी माहितीही देण्यात आली.
या क्षेत्रभेट व ग्रीन डे चा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा यासाठी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोज तडवी, लोकनियुक्त सरपंच ज्योती तडवी यांचे सहकार्य लाभले. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे लिपिक अर्जुन वसावे यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत पूर्ण वेळ उपस्थित राहून सर्व व्यवस्था करुन दिली तसेच सर्वांसाठी नाश्ताची सोयही करुन दिली. यासाठी पालक वर्गाने मुलांना तयार करण्यासाठी खुप मेहनत घेतली त्यांचे शाळेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.