शहादा:शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांचे हमी भावापेक्षा कमी दराने शेतीमाल घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शहाद्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जलिंदर पावरा,वडगाव अध्यक्ष राहूल चव्हाण, राहुल सुळे आदि बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,शहादा तालुक्यातील खेडदिगर येथील व्यापारी मक्का खरेदी केंद्राने जाहीर केलेल्या २०२३-२४ साठी २०९० रुपये हमी भाव असून खेडदिगर येथील व्यापारी अंत्यत अल्पदरात १३००/१४०० रुपये भावाने शेतीमाल खरेदी करतात. त्यात परिसरातील समस्त शेतकऱ्यांची प्रचंड लूट होत आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमी भावाचे ही उल्लंघन करून शेतमाल खरेदी करुन शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही बिरसा फायटर्स सामाजिक संघटने तर्फे करतो आहे.फक्त खेडदिगर येथेच नाही तर शहादा तालुक्यातील अनेक ठिकाणांहून शेतकऱ्यांचे कष्टाचे हमी भावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी केला जातो आहे.
शेती करताना शेतकऱ्याला बेमोसमी पाऊस,ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण,शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँक इ. कडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत,निर्यातीतील होणारे शासकीय बदल अशा अचानक येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करावा लागतो.हवामानात अचानक होणाऱ्या बदलावा मुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. हजारो रुपये खर्च करून शेतकरी आपल्या शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला दरवेळी फळ मिळतेच असे नाही. कारण की शेतकरी निसर्गावर अवलंबून असल्याने शास्वत कमाईचा नक्की अंदाज बांधणे कठीण असते तसेच शेतकऱ्यांसमोर हमीभावाची समस्या निर्माण होतात. त्यामुळे शेतकरी बांधवांना त्यांचे मोलाचे कष्ट करून रात्र दिवस करुन पीक पिकवतो पण काही ठिकाणी असे व्यापारी आहेत,जे शेतकऱ्यांचे कष्टाचे फळ त्यांचा हातातून हिसकावून घेतात,शासनाने शेतकरी यांना २०२२-२३ साठी २०९० रुपये हमी भावात खरेदी करावी असे जाहीर केले आहे, तरी सुद्धा काही व्यापारी १३००/१४०० रुपये भावाने खरेदी करतात आहेत,तरी कुठे तरी शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात लुट होत आहे, वरील विषयावर दखल घेऊन जे लुटारू व्यापा-यांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने केली आहे.