निवेदनाचा आशय असा,
पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत तयार करण्यात आलेल्या अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील रस्त्यांची १० ते १२ वर्षे होऊन देखील दुरुस्ती संबंधीत विभागामार्फत करण्यात येत नसल्याने या रस्त्यांच्या दुरुस्ती अभावी नागरीकांना तसेच वाहनधारकांना गैरसायीचे व त्रासदायक झाले आहे. अक्कलकुवा तालुक्यातील खाई-ईराइपाडा- देवगोई-डाब रस्ता, अलिविहीर-नवलपुर-माळ-खुर्चीमाळ-नेंदवान- ओरपा रस्ता, भराडीपादर ते कुवा-खाई रस्ता, भगदरी ते मांडवा रस्ता, पिंपळखुंटा ते जांगठी- मनीबेली रस्ता, पिंपळखुंटा मोवान- वडफळी-अरेठी-केवडी रस्ता, कुकडीपादर- अरेठी ते जांगठी रस्ता, तसेच धडगाव तालुक्यातील मांडवी ते तोरणमाळ रस्ता या रस्त्यांसह अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असुन ग्रामसडक योजने अंतर्गत या रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर न झाल्यास आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.निवेदनावर नागेश दिलवरसिंग पाडवी विधानसभा निवडणूक प्रमुख अक्कलकुवा /धडगाव यांची सही आहे.