21ते 26 ऑक्टोबर 2023 ज्या शेतकऱ्यांचे नागाई शुगर प्रा ली कडे उसाचे पेमेंट बाकी आहे त्यांना व्याजासह पेमेंट देण्याच्या लेखी आश्वासनानंतर दोन दिवसांपासून चालू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आज तूर्तास दि १७ रोजी स्थगित करण्यात आले.
कालपासून शहादा, तळोदा, नंदुरबार,शिंदखेडा, शिरपूर व सागबारा तालुक्यातील शेतकरी श्री नागाई देवी शुगर प्रा ली ला डिसेंबर 2022 पासून ऊस दिले परंतु 1300 शेतकऱ्यांना कमी अधिक प्रमाणात व शेकडो शेतकऱ्यांना एकही रुपये उसाचे पेमेंट मिळाले नाही अशा शेकडो शेतकऱ्यांनी काल दिनांक 16 ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी बेमुदत धरणे आंदोलन पुकारले होते त्यानुसार प्रकाशाहून मोटारसायकल व ट्रॅक्टर रॅलीने शेकडोंच्या संख्येने नंदुरबार शहरात दाखल झाले ,त्यांना नवापूर चौफुली जवळ पोलिसांनी अडवल्यानंतर आंदोलकांनी जागेवरच ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर पालकमंत्री अनिल पाटील व जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आंदोलस्थळी येऊन चर्चा केली व दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट मिळण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.व साखर आयुक्तांनी नंदुरबार मध्ये येऊन आंदोलकांशी बैठक करून उसाचे पेमेंट व पुढील कार्यवाहीचे आदेश दिले. आंदोलकांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने आंदोलकांनी तिथेच मुक्काम ठोकला होता.
दुसऱ्या दिवशी औरंगाबाद हुन आलेले सहसंचालक शरद जरे, नागाई शुगर प्रा.ली चे चेअरमन रवींद्र चौधरी व त्यांचे संबंधित कर्मचारी व नर्मदा बचाओ आंदोलनाच्या मेधा पाटकर ,राम चौधरी,ओरसिंग पटले,निमा पटले ,गणेश पाटील,रामसिंग गिरासे,प्रमोद पाटील,मुनाफ अली मकरानी ,चेतन साळवे,सुनील पाटील,संदीप पाटील हे उपस्थित होते.
या बैठकीत नागाई शुगर कडून किती शेतकऱ्यांना पेमेंट दिले व देणे बाकी याची माहिती उद्या संध्याकाळ पर्यंत देण्याचे ठरले.दि 19 तारखेपासून साखर आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, नर्मदा आंदोलनाचे शेतकरी प्रतिनिधी व नागाई देवी कारखान्याचे अधिकारी कर्मचारी मिळून याद्या ज्वाईन चेकिंग करणार.दि 21 ऑक्टोबर 2023 पर्यंत 90% शेतकऱ्यांना व्याजासह पेमेंट देणार व 26 ऑक्टोबर2023 पर्यंत 100% पेमेंट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर करणार असे लेखी आश्वासन नागाईचे चेअरमन रवींद्र चौधरी यांनी लेखी दिले.
162318596 निवळ रकम देणे बाकी असे चेअरमन यांनी सांगितले, 26 ऑक्टोबर पर्यंत पेमेंट न झाल्यास 27 तारखेला कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात येईल असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी सांगितले व मेधा पाटकर यांनी ही पुढील कायदेशीर लढाई आंदोलन लढुन सुरू होईल असे बैठकीत सांगितले.
वरील सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास या पुढील आंदोलन अधिक तीव्र असेल असे शेतकऱ्यांनी सांगितले व आंदोलन तूर्तास मागे घेतले.