अर्जदार योगिता अशोक पाटील, रा ता शहादा, हिने पती अशोक बन्सी पाटील, रा ता शिरपूर, यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, येथे पतीने न्यायालय, धुळे, येथे दाखल केलेले प्रकरण न्यायालय, शहादा, येथे वर्ग करण्यासाठी अर्ज दाखल केले होते. थोडक्यात माहिती अशी कि, विवाह नंतर दोन्ही पक्षकारांमध्ये शुल्लक कारणांवरून मतभेद वाढत गेले. फसवणूक, खराब स्वभाव, व्यवहार, पैशांची मागणी, धमकी इत्यादी आरोप लावण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( न्यायमूर्ती श्री. नितीन बी. सूर्यवंशी) यांनी दिनांक १२.१०.२०२३ रोजीच्या आदेशान्वये पतीने न्यायालय, धुळे, येथे दाखल केलेले प्रकरण न्यायालय, शहादा, येथे वर्ग करण्याबाबत स्थगितीचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले आहेत. पत्नी तर्फे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) (9518323726) यांनी काम पाहिले.
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद : प्रकरण न्यायालय, धुळे, हून न्यायालय शहादा, येथे वर्ग करण्याबाबत स्थगितीचे महत्त्वपूर्ण आदेश
October 17, 2023
नंदूरबार :- मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद : प्रकरण न्यायालय, धुळे, हून न्यायालय शहादा, येथे वर्ग करण्याबाबत स्थगितीचे महत्त्वपूर्ण आदेश