तळोदा दि १७ (प्रतिनिधी) नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे.तळोदा येथे विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता पालकमंत्री अनिल पाटील यांनी सप्तश्रृंगी मातेचे दर्शन घेतले. राज्यातील सर्व जनतेला सुखी ठेवण्याचे साकडं त्यांनी मातेला घातले.
दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी नगरपालिकेच्या अमृत २ या शुद्ध पेयजल योजनेच्या भुमीपुजन व वाढीव शहर हद्दवाढीतील नवीन वसाहतीतील रस्त्यांचे भूमिपूजन कार्यक्रमासाठी ते आले होते
दि (१६ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी सप्तश्रृंगी माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सप्तश्रृंगी माता ट्रस्टचे अध्यक्ष मोहन सूर्यवंशी यांनी सत्कार केला.
यावेळी , आमदार राजेश पाडवी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, विलास लोखंडे , रोहीत सूर्यवंशी उपस्थित होते.