Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिक्षक भरतीसाठी बिरसा फायटर्सचे जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन!

शिक्षक भरतीसाठी बिरसा फायटर्सचे जिल्हा परिषदेसमोर
 ठिय्या आंदोलन!

नंदुरबार दि १७ (प्रतिनिधी)विविध प्रश्नांसाठी बिरसा फायटर्सने जिल्हा परिषद नंदुरबार समोर ठिय्या आंदोलन केले.यावेळी आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन उपशिक्षणाधिकारी नंदुरबार व आमदार आमशा पाडवी यांना निवेदन दिले.
               यात सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय मागे घेणे,पेसा जागा वाढवून भरती प्रक्रिया राबवणे,जि.प.शाळेतील रिक्त पदांवर स्थानिक उमेदवारांची नेमणूक करणे,ज्या ठिकाणी अद्यापही पक्की इमारत नाही त्या ठिकाणी इमारत बांधून देणे,स्वतंत्र वर्गखोली,शौचालय,पाण्याची व्यवस्था,वीज,इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे,वस्ती शाळेतील शिक्षकांना सेवेत सामावून घेणे,शिक्षकांचे पगार,फरक बिले वेळेवर द्यावे,विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणे;अशा विविध प्रश्न संदर्भात बिरसा फायटर्सने ठिय्या आंदोलन केले.

           जिल्हा परिषदच्या रिक्त जागांवर डीएड बीएड धारक उमेदवारांची नेमणूक झालीच पाहिजे,वस्तीशाळा शिक्षकांना नियुक्तीपत्र मिळालेच पाहिजे,पेसा शिक्षक भरती झालीच पाहिजे,सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना दत्तक दिल्याचा निर्णय मागे घ्या,कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय,या सरकारचे करायचे काय खाली डोक वर पाय,बिरसा मुंडा की जय, अशा जोरदार घोषणा आंदोलन कर्त्यांनी दिल्या.यावेळी बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा,जिल्हाध्यक्ष भरत पावरा,ठाकरे गटाचा मालतीताई वळवी,मौखिक साहित्यिक भिमसिंग वळवी,एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार वळवी,उपाध्यक्ष शरद सोनी,एकता परिषदेचे सुरजित ठाकरे, बिरसा फायटर्सचे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,धडगांव तालुकाध्यक्ष अजय वळवी,अक्कलकुवा उपाध्यक्ष डॉ.पंकज पाडवी,नंदुरबार उपाध्यक्ष साहेबराव कोकणी,कोशाध्यक्ष हिरामण खर्डे,दारासिंग ठाकरे,जहांगीर वळवी,सायसिंग वळवी आदी.पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.