पृथ्वीवर निसर्गाने मनुष्याला सोबतच चराचर सृष्टी निर्माण केली आहे.हीअमूल्य भेट आहे. मनुष्यच नाही तर पृथ्वीवरील सर्वच जीवजंतूना जीवन जगण्यासाठी अन्नसाखळी निर्माण केली आहे.माणसासह पक्षी नैसर्गिक अन्नपदार्थांवर अवलंबून असतात. एक तऱ्हेने निसर्गात आपले पालन पोषण होते. पक्षी ही निसर्गाचा समतोल राखण्यासाठी म्हत्वाचा घटक आहे. जंगलात नद्या आटल्या आहेत, उन्हाची तीव्रता जास्त आहे,अशात पक्ष्यांना अन्न व पाणी दुरापास्त होते.
त्यांच्या संरक्षणासाठी जवाबदार आणि जागरूक बनायला हवे हा दृष्टिकोन ठेवून श्री काका गणेश मंडळ यांच्यामार्फत शहरालगत काकाशेठ गल्लीतील काकेश्वर महादेव मंदिर , गोऱ्या मारुती मंदिर , रोकडमन मारुती मंदिर, कनकेश्वर महादेव मंदिर, कालभैरव मंदिर या परीसरातील झाडांवर ठीकठिकाणी पक्ष्यांना जगवीण्यासाठी दाणे पाणी ची सोय उपलब्ध करून पक्ष्यांप्रती दयाभाव जागृत करण्याचा प्रयत्न पदाधिकारी, सदस्य यांच्या सहभागातून ही चळवळ गावात पोहोचवण्याचे उद्दिष्ट गणेश मंडळाचे प्रयत्नातून ठरविण्यात आले आहे.
या भूतदयावर आधारित उपक्रमाच्या शुभारंभ घटस्थापनेपासुन करण्यात आला आहे.या उपक्रमासाठी काका गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आहे.