धडगाव दि ३१ (धडगाव)
मा.तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारीसाहेब,धडगाव(अक्राणी) यांना तालुक्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेच्या बाबतीत निवेदन देण्यात आले.सातपुड्यातील मोलगी ते धडगाव रस्ता असो व खेडयापाड्यातील रस्ते असो.आजही परिस्थिती जशीच तशी आहे.आजही दुर्गम भागात दळणवळणाच्या सोई उपलब्ध नाहीत.गावात जाण्यासाठी रस्ते नाहीत हे आमचं बकाल जीवन आहे....खरी वास्तविक परिस्थिती आहे.
तालुक्यात असणारे रस्ते देखील खड्डेमय असल्याने असे अनेक ठिकाणी अपघाताचे अधिक प्रमाण वाढले आहे.त्यात निष्पाप लोकांचा मृत्यू होत आहे.यास जबाबदार कोण? तालुक्यात काही दिवसापुर्वीच नंदलवड येथील दोन्ही भाऊ-बहिणीच्या मृत्युमुळे मन हेलावून टाकणारी घटना घडली.यास कारणीभूत कोण? अजुन अशा किती निष्पाप लोकांचा बळी जाणार समजणं कठीण होत आहे.तालुक्यात सर्वत्र रस्ते मृत्युंना आमंत्रण देत आहे.अशा अपघातामुळे अनेकांचे कुटूबे उघड्यावर येत आहे.तरी संबंधित विभागाला जाग येईल का? शहरी भागातील रस्त्यांचा होणारा बदल पाहता.. सातपुडा आदिवासी भागात रस्त्याच्या बाबतीत असा दुटप्पीपणा का? संबंधित विभागाला वारंवार निवेदने देऊन देखील ठेकेदार व संबंधित यंत्रणा यांचे मनमानी काम अनुभवास येत आहे.एकंदरीत शासनाचे ध्येय धोरणं, दळणवळणाच्या सोयी सुविधा, रस्ते मजबुत झाले पाहिजे., परंतु सातपुड्यातील शासन प्रशासनाच्या अधिका-यांचे रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याने ही वेळ आली आहे.शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर बंदी घातली पाहिजे.जनतेच्या विकासाच्या नावाखाली थातुर-मातुर रस्याचे कामं करणा-यांची सखोल चौकशी करण्याची कार्यवाही करावी.अशी मागणी केली जात आहे.यात निवेदन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री.गुलाबसिंग दादा वळवी, श्री.जगिंदर दादा वळवी,राजु पाडवी,मणिंदर वळवी,कुवरसिंग पराडके (बिरसा फायटर्स संघटनेचे धडगाव ता.उपाध्यक्ष) तसेच इतरांच्या सहया आहेत.